Home » Blog » कोल्हापूरात ५० किलोमीटर अल्ट्रा मॅरेथॉनला प्रतिसाद

कोल्हापूरात ५० किलोमीटर अल्ट्रा मॅरेथॉनला प्रतिसाद

नाशिक, अहिल्यानगरातून कोल्हापूरात रॅलीचे जंगी स्वागत

by प्रतिनिधी
0 comments
Vijay Diwas Ultra marathon

कोल्हापूर; प्रतिनिधी : भारत १९७१ च्या युध्दात पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर भारतीय सैन्याच्या विजयाचे स्मरण करुन देण्यासाठी देशभर विजय दिन साजरा करण्यात येतो. विजय दिनानिमित्त कोल्हापूरात आयोजित करण्यात आलेल्या ५० किलोमीटर अल्ट्रा मॅरेथॉनला उदंड प्रतिसाद मिळाला. नाशिक अहिल्यानगरातून कोल्हापूरात आलेल्या रॅलीचे गुरुवारी पहाटे टी.ए.बटालियन येथे स्वागत करण्यात आले. १६ जानेवारीला पुण्यात रॅलीचा समारोप होणार आहे. (Vijay Diwas Ultra marathon)

कोल्हापूर येथे प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे आणि निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात रॅलीस सुरुवात करण्यात आली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी लेझिम, झांज-पथकाचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून १९७१ च्या भारत-पाक युद्धातील भारतीय सैन्याच्या विजयाचे स्मरण करून दिले.  तसेच भारतीय सैनिकांच्या बलिदानाला भावपूर्ण श्रद्धांजलीही वाहिली. कोल्हापूर येथील आयोजित ५० किमी अल्ट्रा मॅरेथॉन दरम्यान इतर ठिकाणांहून आलेले पंधरा प्रमुख धावपटू, शंभर स्थानिक धावपटू यात आयर्नमॅनसह इतर २०० धावपटू सामील झाले. शहरातील पाचशेहून अधिक स्थानिक धावपटूंनी अल्ट्रा-मॅरेथॉनला अविस्मरणीय बनवण्यासाठी ठिकठिकाणी सहभाग नोंदविला. विविध मार्गावर पंधराशेपेक्षा जास्त विद्यार्थी धावपटू मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. सुरूवातीला झालेल्या कार्यक्रमावेळी १०९ बटालीयन, मराठा लाईट इन्फंन्ट्री रेजिमेंट कोल्हापूर येथील कमांडिंग ऑफिसर आणि इतर वरिष्ठ अधिकारी, सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Vijay Diwas Ultra marathon)

भारतीय लष्कराच्या मुख्यालयाच्या दक्षिण कमांडने आयोजित केलेली ही ४०५ किमी मॅरेथॉन १५ जानेवारी २०२५ रोजी पुण्यात होणाऱ्या पहिल्याच आर्मी डे २०२५ च्या समारंभाच्या उद्घाटनाचा पडदा उघडणारी आहे. विजय दिवसानिमित्त आयोजित केलेल्या या मॅरेथॉनचा समारोप १६ डिसेंबर रोजी पुण्यात होईल. या अल्ट्रा मॅरेथॉनचे उद्घाटन सहा डिसेंबर रोजी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले होते. नाशिक आणि अहिल्यानगरमधून या मॅरेथॉनचा प्रवास झाला. पुण्यात सांगता होण्यापूर्वी कोल्हापूरमधे या मॅरेथॅनचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा :

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00