Home » Blog » Rekha Gupta: रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री

Rekha Gupta: रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री

पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर लगेचच सर्वोच्च संधी

by प्रतिनिधी
0 comments
Rekha Gupta

नवी दिल्ली : प्रतिनिधी : देशाच्या राजधानी असलेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी रेखा गुप्ता यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. भाजपकडून प्रथमच आमदार झालेल्या रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. त्यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’च्या वंदना कुमारी यांचा २९ हजार ५९५ मतांनी पराभव केला. गुरुवारी (ता.२०) रामलिला मैदानावर शपथविधी होणार आहे. (Rekha Gupta)

बुधवारी भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत रेखा गुप्ता यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी जाहीर करण्यात आले. गुप्ता यांच्या निवडीमुळे तब्बल २७ वर्षांनंतर राष्ट्रीय राजधानीत पुनरागमन झालेल्या भाजपच्या इतिहासात दुसऱ्यांदा महिलेला मुख्यमंत्रिपद मिळणार आहे. पहिल्यांदाच आमदार झालेल्या रेखा यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत शालीमार बाग मतदारसंघातून विजय मिळवला. त्यांनी ‘आप’च्या वंदना कुमारी यांचा २९,५९५ मतांनी पराभव केला. (Rekha Gupta)

आपल्यावर विश्वास ठेवल्याबद्दल भाजपचे नेतृत्व आणि नवनिर्वाचित आमदारांचे गुप्ता यांनी आभार मानले आहेत.

‘माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी पक्षाचे नेते नेतृत्व आणि आमदारांचे आभार मानू इच्छिते. मी दिल्लीच्या विकासासाठी मुख्यमंत्री म्हणून माझ्या जबाबदाऱ्या पार पाडेन,’ असे त्यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. (Rekha Gupta)

नेतेपदी निवडीच्या घोषणेनंतर गुप्ता आता दिल्लीत भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन करण्याचा औपचारिक दावा करतील. त्यासाठी त्या राजभवन येथे लेफ्टनंट गव्हर्नर व्ही. के. सक्सेना यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

कोण आहेत रेखा गुप्ता?

रेखा गुप्ता यांनी १९९२ मध्ये दिल्ली विद्यापीठातील दौलत राम महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून आपला राजकीय प्रवास सुरू केला. १९९६-९७ मध्ये, त्या दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या अध्यक्ष झाल्या. २००७ मध्ये रेखा गुप्ता उत्तर पितमपुरा येथून नगरसेवक म्हणून निवडून आल्या. जिथे त्यांनी ग्रंथालये, उद्याने आणि स्विमिंग पूल यांसारख्या स्थानिक सुविधा सुधारण्यास मदत केली. उच्च शिक्षणात आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिला विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी त्यांनी ‘सुमेधा योजना’ देखील सुरू केली. महिला कल्याण आणि बाल विकास समितीच्या अध्यक्षा म्हणून, त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला. (Rekha Gupta)

गुप्ता यांनी दिल्लीतील भाजप महिला मोर्चाच्या सरचिटणीस आणि त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीवरही काम केले. ५० वर्षांच्या रेखा यांचा जन्म १९७४ मध्ये हरियाणातील जिंद जिल्ह्यातील नंदगड गावात झाला. त्यांचे वडील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी पदावर होते. १९७६ मध्ये जेव्हा रेखा फक्त दोन वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांचे कुटुंब दिल्लीला आले. त्यानंतर त्यांनी दिल्लीत प्राथमिक ते उच्च शिक्षण पूर्ण केले.

हेही वाचा :

मोदी सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन

सिद्धरामय्यांविरोधात पुरावे नाहीत

अदानी अडचणीत

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00