मुंबई : विशेष प्रतिनिधी : एकनाथ शिंदे यांचा भगव्याशी काही संबंध नाही. तपास यंत्रणेच्या भीतीपोटी त्यांनी गद्दारांना घेऊन शिवसेना फोडली. यापूर्वी ते काँग्रेसमध्ये जाणार होते. त्यासाठी त्यांनी काँग्रेसचे तत्कालीन नेते अहमद पटेल यांची भेट घेतली होती, असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी शनिवारी (१५ मार्च) केला. (Raut criticize Shinde)
धुळवडीच्यादिनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना काँग्रेस सोबत येण्याची ऑफर दिली होती. त्याला उत्तर देताना शिंदे यांनी प्रत्युत्तर देताना शिंदे यांनी आमचा रंग भगवा आहे, जे कोणी येतील त्यांचे स्वागत आहे असे म्हटले होते. राऊत यांनी शिंदे यांच्यावर टीका करीत हा गौप्यस्फोट केला. तसेच नानांच्या ऑफरमध्ये सुधीर मुनगंटीवार आहेत का, असा चिमटाही काढला. ते म्हणाले, ‘शिंदे यांचा भगव्याशी काही संबंध नाही. त्यांचा गट भाजपच्या ताटाखालचे मांजर झाली आहे. त्यांच्या आणि अजित पवार यांच्या हातात भाजपचा झेंडा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा आहे. भगव्या झेंड्याशी त्यांचा काही संबंध नाही. तो उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे.’ (Raut criticize Shinde)
गद्दार शिंदे काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात काँग्रेसकडे चालले होते. काँग्रेसचे नेते अहमद पटेल आता हयात नाहीत, पण दिल्लीत त्यांच्याशी पहाटे चर्चाही केली होती. त्यावेळी त्यांना ते शक्य झाले नाही. पृथ्वीराज चव्हाण यांना विचारा ते त्याबाबत जास्त माहिती देतील, असा दावाही राऊत यांनी केला. (Raut criticize Shinde)
नाना पटोले यांच्या ऑफरबद्दल ते म्हणाले, ‘नाना हे आमचे सहकारी आहेत. राजकारणात काहीही अशक्य नसते. मविआ सरकार येईल असे कोणाला वाटले होते का? राजकारणात सर्व शक्यता आहेत. त्यांनी कुणाला ऑफर दिली आहे व कुणी मान्य केली आहे का हे त्यांच्याशी चर्चा करून बघू. राजकारणात रुसवे फुगवे, आदळआपट सुरू आहे. नाना यांनी लवकर भांडे वाजवले, थोडे थांबायला हवे होते.’ त्यांच्या ऑफरमध्ये मुनगंटीवार आहेत का? असा टोलाही त्यांनी लगावला. (Raut criticize Shinde)
मग नेतेपद कसे दिले? : खा.मस्के
एकनाथ शिंदे यांच्या मागे राज्यातील जनता आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून वारंवार त्यांच्यावर टीका करण्यात येत असल्याचे प्रत्युत्तर शिंदे गटाचे खा. नरेंद्र मस्के यांनी दिले. ते म्हणाले, एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते हे माहीत होते तर मग त्यांना सेनेत नेतेपद कसे दिले होते, याचा खुलासा राऊत यांनी करावा, असे आव्हानही त्यांनी दिले.
हेही वाचा :
पुन्हा एकदा ठाकरे बंधूंना एकत्र येण्याची साद!
भारतीय संशोधक विद्यार्थिनीचा व्हिसा रद्द