Home » Blog » ‘स्वाभिमानी’चा २५ रोजी ऊस परिषदेत एल्गार

‘स्वाभिमानी’चा २५ रोजी ऊस परिषदेत एल्गार

Raju Shetti : ‘स्वाभिमानी’चा २५ रोजी ऊस परिषदेत एल्गार

by प्रतिनिधी
0 comments
Raju Shetti

कोल्हापूर; प्रतिनिधी : गतवर्षी गेलेल्या उसाला प्रतिटन २०० रुपयांचा दुसरा हप्ता अगोदर द्यावा त्यानंतरच यावर्षीच्या हंगाम सुरू करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खा. राजू शेट्टी यांनी केली. २५ ऑक्टोबरला जयसिंगपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परीषद होणार असल्याचेही जाहीर केले. उदगांव (ता. शिरोळ) येथे संघटनेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आण्णाप्पा पांदारे होते. (Raju Shetti)

यावेळी शेट्टी म्हणाले, ‘महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या नाही तर उद्योगपतींच्या बाजूचे आहे. खा. शरद पवार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गप्प आहेत.  राज्यात सध्या परिवर्तनाची गरज आहे. मजबूत तिसऱ्या आघाडीची आवश्यकता आहे. त्यासाठी परिवर्तन महाशक्ती आघाडीने सर्व लहान पक्षांना एकत्र करून नवा पर्याय दिला आहे. गतवर्षीच्या ऊस दराचे आंदोलन झाल्यामुळे साखर कारखानदारांना दर देणे भाग पडले. यापुढे स्वाभिमानीच्या आंदोलनाची व्याप्ती वाढवणार आहे.  शिष्यवृत्तीसाठी डाटा गोळा करणारे, ऊसतोड मजूर, वाहतूकदार, कंत्राटी वीज कर्मचारी यांच्यासाठीही यापुढे आंदोलन करण्यात येईल.  यावेळी प्रा. जालिंदर पाटील, जि.प.चे माजी सदस्य अनिल मादनाईक यांची भाषणे झाली. (Raju Shetti)

स्वागत राजाराम देसाई यांनी केले. प्रास्ताविक मिलिंद साखरपे यांनी केले. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, जनार्दन पाटील , भागवत जाधव, राजेंद्र गड्डयाण्णवार, राजगोंडा पाटील, सचिन शिंदे, अजित पाटील, जयकुमार कोल्हे आदींनी मनोगत व्यक्त केले.

हेही वाचा :

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00