Home » Blog » Raj Thackeray’s anger at Waghmare : राज ठाकरेंची तळपायाची आग मस्तकात गेली

Raj Thackeray’s anger at Waghmare : राज ठाकरेंची तळपायाची आग मस्तकात गेली

by प्रतिनिधी
0 comments
Raj Thackeray's anger at Waghmare

मुंबई : प्रतिनिधी : राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या. यावेळी पत्रकारांनी दुबार मतदारबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना दिनेश वाघमारे यांची चांगलीच भंबेरी उडाली. त्यांनी गोलमाल उत्तर देत वेळ मारुन दिली. पत्रकार परिषदेतील वाघमारे यांच्या खुलाश्यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. दिनेश वाघमारे यांची पत्रकार परिषद पाहून तळपायाची आग मस्तकात गेली अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

राज ठाकरे यांनी ‘एक्स’  या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना म्हटले की, आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली. ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता शंभर टक्के खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे, हे फक्त संविधानात आहे, तसेच हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे. कारण दुबार मतदार नोंदणीपासून, ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय? जबाबदारी तर तुम्ही केव्हाच झटकली आहे. त्यानंतर आता उत्तरदायित्व पण नाकारणार, मग तुमच्या पदांच करायचं काय? महाराष्ट्रातील जनतेने ही क्लिप जरूर पहा, असे आवाहन करतानाच राज ठाकरे म्हणाले की, तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमानाचा उगम कुठून आहे हे तुम्हाला कळेल. बाकी या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारून निवडणूक आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं मनापासून अभिनंदन, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00