रांची वृत्तसंस्था : आम्ही तुम्हाला आदिवासी म्हणतो, भाजप तुम्हाला वनवासी म्हणतो. राज्यघटनेत वनवासी हा शब्द नाही. आदिवासी हे देशाचे पहिले मालक आहेत. त्यांचा जल, जंगल, जमीन यावर पहिला हक्क असायला हवा. आदिवासींनी केवळ वनवासी म्हणून राहावे, अशी भाजपची इच्छा आहे, अशा शब्दांत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजप आणि आमची विचारांची लढाई असून, त्यांना संविधान नष्ट करायचे आहे, तर आम्हाला वाचवायचे आहे, असे ते म्हणाले.
राहुल काय म्हणाले ?
- आम्ही जातीवर आधारित जनगणना करू.
- ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण लागू करणार.
- प्रत्येक कुटुंबाला १५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा
- एससी-एसटी, ओबीसींचे आरक्षण वाढव
- अग्निवीर योजना संपुष्टात आणू
- ४०० रुपयांना सिलिंडर देणार
Rahul Gandhi : ‘लव्ह यू’ म्हणत भाषणाला सुरुवात
आपल्या भाषणादरम्यान राहुल यांनी उपस्थित लोकांना संविधानाचे पुस्तकही दाखवले. राहुल यांनी ‘लव्ह यू’ म्हणत भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, की देशात दोन विचारसरणींमध्ये लढा सुरू आहे. आम्ही संविधान वाचवत आहोत आणि ते ते नष्ट करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी-अंबानींना घटनेतील तरतुदी रद्द कराव्यात असे वाटते. वनवासी या शब्दावर भाजपला घेरताना ते म्हणाले, की आदिवासींचा मुलगा डॉक्टर किंवा इंजिनिअर होऊ नये, असे त्यांना वाटते. उच्च शिक्षणात आदिवासी समाजाचा सहभाग कमी आहे.
आदिवासींच्या जमिनी हिसकावल्या जात आहेत : राहुल गांधी
राहुल विकासाच्या नावाखाली आदिवासींच्या जमिनी हिसकावल्या जात असल्याचा आरोप करून राहुल म्हणाले, की तुमच्या जमिनीवर कारखाना उभारला तर तुमच्या मुलांना तिथे नोकऱ्या मिळाव्यात, अशी आमची इच्छा आहे. देशात एससी, एसटी, अल्पसंख्याक आणि ओबीसींची संख्या ९० टक्के आहे; परंतु घटनात्मक संस्थांमध्ये त्यांचा सहभाग खूपच कमी आहे. माध्यमांमध्ये आदिवासी आणि ओबीसींचा सहभागही कमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ २५ लोकांचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले; परंतु जेव्हा आपण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बोलतो तेव्हा ते म्हणतात की आम्ही सवय मोडत आहोत.
संविधान हमारे सांस्कृतिक मूल्यों का रक्षक है।
ये हमें स्वतंत्र और निर्भीक होकर आत्मसम्मान के साथ जीने की आजादी देता है।
हम हर कीमत पर संविधान की रक्षा करेंगे।
📍 लोहरदगा, झारखंड pic.twitter.com/fIjQVuL07g
— Congress (@INCIndia) November 8, 2024
हेही वाचा
- राजा जुनाच, राज नवे
- डिजिटल तंत्राआधारे प्रचार झाला हायटेक
- सरकार आल्यास महिलांना महिना ३ हजार : राहूल गांधी