चेन्नई : एकेकाळी बहरलेल्या सिंधू संस्कृतीच्या लिपीचा उलगडा आपण करू शकलेलो नाही. शंभर वर्षांनंतरही हे रहस्य कायम आहे. पुरातत्वशास्त्रज्ञ, तमिळ संगणक तज्ञ आणि जगभरातील भाषाशास्त्रज्ञ ही लिपी उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत. या लिपीचा उलगडा करणाऱ्या तज्ज्ञ किंवा संस्थांना १ दशलक्ष डॉलर्सचे (सुमारे नऊ कोटी रुपये) बक्षीस तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी जाहीर केले. (Prize Announcement)
सर जॉन मार्शल यांनी सिंधू संस्कृतीचा शोध लावल्याच्या घटनेला शंभर वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
सिंधू संस्कृतीची लिपी उलगडण्याचा प्रयत्न पुरातत्वशास्त्रज्ञ, तमिळ संगणक तज्ज्ञ आणि जगभरातील भाषाशास्त्रज्ञ करत आहेत. त्यांच्या संशोधनाला सरकार प्रोत्साहन देईल. मुख्यमंत्र्यांनी प्रख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ आणि इतिहासतज्ज्ञ इरावथम महादेवन यांच्या नावाने अध्यासन केंद्र सुरू करण्याची घोषणा केली. तसेच त्यासाठी २ कोटी निधीही जाहीर केला. राज्य पुरातत्व विभाग आणि चेन्नई येथील सिंधू संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधू संस्कृतीवरील संशोधन करण्यात येईल.(Prize Announcement)
तामिळ संस्कृतीचे प्राचीनत्व ठळकपणे पुढे आणण्यासाठी काम करणाऱ्या नाणकशास्त्रज्ञ आणि शीलालेख तज्ज्ञांना सरकार सन्मानित करेल, असे स्टॅलिन यांनी यावेळी जाहीर केले.
ते म्हणाले, तामिळनाडूत सापडलेल्या जवळपास ६० टक्के भित्तिचित्रांच्या खुणा सिंधू संस्कृतीत सापडलेल्या लिपींच्या समांतर होत्या. पुरातत्वशास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे की दक्षिण भारतातील ९० टक्क्यांहून ग्राफिटी चिन्हे आणि सिंधू संस्कृतीशी समांतर होते.(Prize Announcement)
सर जॉन मार्शल यांचा शोध इतिहासाला कलाटणी देणारा आणि भूतकाळातील समजाला छेद देणारा आहे असे सांगून ते म्हणाले, ‘आर्य आणि संस्कृत ही भारतीय संस्कृतीचे मूळ आहे, असे अनेकजण सांगत होते. जॉन मार्शल यांच्या शोधाने ही धारणा पूर्णपणे बदलली. सिंधू संस्कृती ही आर्य संस्कृतीच्या आधीपासून होती आणि सिंधू खोऱ्यात बोलली जाणारी भाषा द्रविडीयन असू शकते या त्यांच्या युक्तिवादाला बळ मिळाले.’
सिंधू खोऱ्यात बैल होते. ते द्रविडीयन प्रतीक होते. ते सिंधू खोऱ्यापासून तामिळनाडूतील अलंगनलूर (जेथे जल्लीकट्टू आयोजित केले जातात) पर्यंत आढळतात. प्राचीन तमिळ साहित्यातही त्याचा उल्लेख आहे. सिंधू खोऱ्यातील प्रतिकांमध्ये बैलांना काबूत आणणाऱ्या तरुणांच्या प्रतिमाही आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
तामिळनाडूचे अर्थ आणि पुरातत्व मंत्री थंगम थेन्नारसू आणि वित्त सचिव टी. उदयचंद्रन यांना या विषयाचे सखोल ज्ञान आहे, हे तामिळनाडूचे भाग्य असल्याचे मुख्यमंत्री स्टॅलिन म्हणाले.
. . . . .