नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाने गुरुवारी मणिपूर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली. राज्यातील अशांततेच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच एन. बीरेन सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राष्ट्रपती राजवटीचा निर्णय घेण्यात आला. (Manipur)
गृहमंत्रालयाने याविषयीची सूचना जारी केली आहे. “माझ्याकडे राज्यपालांचा अहवाल आला आहे आणि या अहवालासह मिळालेल्या माहितीचा मी आढावा घेतला आहे. प्राप्त परिस्थितीमध्ये राज्य सरकार राज्यघटनेच्या तरतुदींनुसार योग्यरीत्या कार्य करू शकत नाही, अशी माझी खात्री झाली आहे. त्यामुळे राज्यघटनेच्या ३५६ व्या कलमानुसार राष्ट्रपती या नात्याने मी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करत आहे. याअंतर्गत राज्यपालांकडे सर्व अधिकार असतील,” असे या सूचनेत म्हटले आहे. (Manipur)
बीरेन सिंह यांनी रविवारीच (९ फेब्रुवारी) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडून सुपूर्द केला होता. तत्पूर्वी, त्यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेटही घेतली होती. मणिपूरमध्ये २०२३ पासून मैतेई आणि कूकी या जमातींच्या लोकांमध्ये वांशिक हिंसाचार सुरू असून यामध्ये आतापर्यंत २५० पेक्षा अधिक जणांना प्राण गमवावे लागले आहेत. (Manipur)
हेही वाचा :