नवी दिल्ली : ज्युनिअर गटातील राष्ट्रीय सुवर्णपदकविजेती पॉवरलिफ्टर यश्तिका आचार्यचा बुधवारी सरावावेळी अपघाती मृत्यू झाला. राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यामध्ये व्यायामशाळेत सराव करताना २७० किलो वजनाचा रॉड तिच्या मानेवर पडला. (Powerlifting)
नया शहर पोलिस ठाण्याचे अंमलदार विक्रम तिवारी यांनी या अपघाताविषयी माहिती दिली. बिकानेरमध्ये ती प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत होती. भारत्तोलनाचा सराव करत असताना २७० किलोंचा रॉड तिच्या हातून निसटून मानेवर पडला. या वजनामुळे तिच्या मानेचे हाड मोडले. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला. यावेळी तिच्या प्रशिक्षकांनाही किरकोळ दुखापत झाली. याप्रकरणी कुटुंबाकडून कोणतीही तक्रार अद्याप दाखल करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी पंचनामा पूर्ण करून मृतदेह कुटुंबियांकडे सोपवला आहे. (Powerlifting)
यश्तिकाने ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेत पॉवरलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. पॉवरलिफ्टिंग खेळाचा अद्याप ऑलिंपिकमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. या खेळामध्ये स्क्वॉट, बेंचप्रेस आणि डेडलिफ्ट या तीन प्रकारांमध्ये सर्वाधिक वजन उचलणारा स्पर्धक विजेता ठरतो. (Powerlifting)
हेही वाचा :
भारताचा विश्वविजेत्या जर्मनीला धक्का