महाराष्ट्र दिनमान डेस्क : पश्चिम बंगालमधील एका सरकारी कॉलेजमधील प्राध्यापिकेच्या विवाहाने खळबळ उडाली आहे. प्रो. पायल बॅनर्जी दास यांनी त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांशी लग्नगाळ बांधली आहे. त्यांच्या विवाहाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार फिरत आहे. विद्यापीठाने विवाह प्रकरणाचा तपास करण्याचा आदेश दिला आहे. संबधित प्राध्यापिकेने या संदर्भात खुलासा करताना हा खराखुरा विवाह नसून अभ्यासाचा विषय शिकवताना एक नाटक केले होते असा खुलासा केला आहे. प्राध्यापिकेच्या विवाहावर चारही बाजूंने टीका होऊ लागल्यावर विद्यापीठ प्रशासनाने त्यांचा राजीनामा मागितला आहे. (Payal banerjee)
प्राध्यापिकेच्या विवाहाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर विद्यापीठाने तीन सदस्यांची समिती नेमली. या समितीने प्राध्यापिकेकडे स्पष्टीकरण मागितले आहे. पहिला प्राध्यापिकेने असे सांगितले की, हा एक साइको ड्रामा होता. तो अभ्यासाचा विषय होता. हे खरोखरचे लग्न नाही.
पश्चिम बंगालधील नादिया जिल्ह्यातील हरिंगहाटामधील मौलाना अबुल कलाम आझाद प्रोऔद्योगिक विश्वविद्यालय (एमएकेएयूटी) येथील ही घटना आहे. प्रो. पायल बॅनर्जी या तिथे अपलाईट सायकॉलॉजीच्या प्रोफेसर आहेत. २८ जानेवारीला एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामध्ये प्रा. पायल बॅनर्जी या वधूच्या वेषात असून पहिल्या वर्षातील एक विद्यार्थी प्रो. पायल बॅनर्जी यांना हिंदू बंगाली विवाह पद्धतीनुसार सिंदूर दान आणि माला बदल हे विधी करताना आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर समाजमाध्यमावर मोठी चर्चा सुरू झाली. त्यानंतर विश्वविद्यालयाने तीन सदस्यांची समिती स्थापन केली. समितीच्यापुढे प्रोफेसर बॅनर्जी यांनी सांगितले की हा एक साइको ड्रामा होता. हा अभ्यासाचा विषय आहे. (Payal banerjee)
प्रोफेसर बॅनर्जीने दावा केला की हा व्हिडिओ केवळ विभागासाठी बनवला होता. मनोविज्ञान विभागाची छबी खराब करण्यासाठी हा व्हिडिओ लिक करण्यात आला. चौकशी समितीसमोर बॅनर्जी यांची चौकशी झाल्यावर त्यांना सुट्टीवर जाण्यास सांगितले. समिती आणखी काही लोकांचे जबाब घेणार आहे. चौकशी समितीत विविध विभागातील तीन महिलांचा समावेश आहे.
या संदर्भात एमएकेएयुटी चे कार्यवाहक कुलपती तापस चक्रवती यांनी असे सांगितले की संबंधित प्राध्यापिका ही आता विद्यापीठाचा हिस्सा बनू शकत नाही. त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. तसेच संबधित प्राध्यापिकेने आपले सोशल मिडियावरील सर्व अकाउंट डिॲक्टिव्हेट केली आहेत. (Payal banerjee)
एमएकेएयुटी रजिस्टार पार्थ लाहिडीने सांगितले की या घटनेने संबंधित प्राध्यापिकेला सुट्टीवर जाण्यास सांगितले. संबंधित प्राध्यापिकेला योग्य वेळी निर्णय सांगितला जाईल. तर संबंधित प्राध्यापिकेने शैक्षणिक आणि सामाजिक प्रतिष्ठेचे जे नुकसान झाले आहे त्याबद्दल कायदेशीर मार्गाने न्याय मागणार आहेत. संबंधित प्राध्यापिकेने संबंधित व्हिडिओ हा साइको ड्रामा प्रोजेक्टचा एक भाग होता हा दावा नाकारला आहे. संबंधित प्राध्यापिका आणि मुलाचे बाहेर फिरायला गेलेल्या घटनांचे व्हिडिओही पुढे आले आहेत. या संदर्भात प्राध्यापिकेशी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही असे वृत्त ‘नवभारत टाइम्स’ने दिले आहे.
हेही वाचा :
उच्च शिक्षणात केंद्रीकरणाचा धोका
दिल्लीसाठी १३ हजारावर केंद्रांवर मतदान
वरुण चक्रवर्तीला ‘प्रमोशन’