Home » Blog » patanjali chilli powder : ‘पतंजली’च्या मिरची पूडमध्ये…

patanjali chilli powder : ‘पतंजली’च्या मिरची पूडमध्ये…

कीटकनाशकामुळे चार टन मिरची पूड परत घेण्याचे निर्देश

by प्रतिनिधी
0 comments
patanjali chilli powder

मुंबई : पतंजलीच्या मिरची पावडरमध्ये कीटकनाशकाचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आढळले आहे. त्यामुळे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणा (FSSAI) ने ते तत्काळ बाजारातून हटवण्याचे निर्देश दिले आहेत. प्राधिकरणाच्या दणक्यामुळे पतंजलीने प्रत्येकी २०० ग्रॅम वजनाची चार टन लाल मिरची पावडर पॅक परत मागवले आहेत.(patanjali chilli powder)

‘एफएसएसएआय’ने पतंजलीच्या या पॅकबंद मिरची पावडरचे नमुने तपासणीसाठी घेतले. ते तपासले असता नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळले आहेत. उत्पादनाचे नमुने तपासले असता त्यात कीटकनाशकांचे कमाल परवानगी मर्यादेचे पालन होतत नसल्याचे आढळले, असे कंपनीनेचे शुक्रवारी सांगितले. ज्या ग्राहकांनी हे पावडर पॅक खरेदी केले आहेत त्यांना कंपनी परतावा देईल. ‘एफएसएसएआय’ लाल मिरची पावडरसह विविध खाद्यपदार्थांसाठी कीटकनाशकांच्या अवशेषांसाठी कमाल मर्यादा ठरवत असते. (patanjali chilli powder)

‘आक्षेप घेण्यात आलेली पावडर परत घेण्यासाठी कंपनीने आपल्या वितरण प्रणालीतील भागीदारांशी संपर्क साधला आहे. त्यांना ही पावडर बाजारातून मागे घेण्यासाठी तत्काळ पावले उचलली आहेत. ज्या ग्राहकांनी असे पॅकेज खरेदी केले आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवी यासाठी जाहिराती जारी केल्या आहेत. शिवाय ग्राहकांनी खरेदी केलेली अशी पॅकेट्स खरेदी केलेल्या ठिकाणी परत देऊन पूर्ण परताव्याची मागणी करण्यास सांगितले आहे,’ असे पतंजली फूड्सचे सीईओ संजीव अस्थाना यांनी स्पष्ट केले. तथापि, कीटकनाशकाचे प्रमाण आढळलेल्या मिरची पुडीचे प्रमाण खूपच कमी आहे, असा दावा फर्मने केला आहे. (patanjali chilli powder)

पतंजली फूड्स विविध खाद्यतेल आणि बिस्किटे, नूडल्स आणि साखरेसह पॅकेज केलेले खाद्यपदार्थ विकते. योगगुरू बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखाली कंपनीच्या पतंजली आयुर्वेदने भारताच्या ग्राहकोपयोगी वस्तूंच्या बाजारपेठेत स्वतःचा एक ब्रँड म्हणून स्थान मिळवले आहे. ही सर्व उत्पादने नैसर्गिक (सेंद्रीय) असल्यचा दावाही करण्यात येतो.

हेही वाचा :

एसटी भाडेवाडीचा दणका

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00