Home » Blog » Oppositions slammed PM: मोदी सरकारने ताठ कण्याने अमेरिकेला विरोध करावा

Oppositions slammed PM: मोदी सरकारने ताठ कण्याने अमेरिकेला विरोध करावा

विरोधी पक्षांनी ट्रम्प कर धोरणावर सुनावले

by प्रतिनिधी
0 comments
Oppositions slammed PM

नवी दिल्ली : अमेरिकेने भारतावर २७ टक्के परस्पर कर लादला आहे. याबद्दल काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीकास्र सोडले. मोदी सरकारने ताठ कण्याने अमेरिकेला विरोध करावा आणि राष्ट्रीय हितांचे रक्षण करावे, असे आवाहनही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केले.(Oppositions slammed PM)

लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेने लादलेल्या या करांमुळे भारतीय अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त होईल.  विशेषतः ऑटोमोबाईल्स, औषधनिर्माण आणि शेतीसारख्या उद्योगांवर गंभीर परिणाम होतील, असा इशारा दिला.

शून्य प्रहरात लोकसभेत बोलताना, गांधी यांनी अमेरिकेने लादलेल्या करांबद्दल केंद्र सरकारची काय भूमिका आहे, ते जाहीर करावे असे आवाहन केले. (Oppositions slammed PM)

‘‘कोणीतरी एकदा इंदिरा गांधींना विचारले होते – ‘परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत तुम्ही डावीकडे झुकता की उजवीकडे झुकता,’ त्यावर इंदिरा गांधींनी उत्तर दिले, ‘मी डावीकडे किंवा उजवीकडे झुकत नाही, मी ताठ उभी आहे. मी भारतीय आहे आणि मी ताठ उभी आहे’,” अशी आठवणही राहुल गांधी यांनी सांगितली.

काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही पंतप्रधान मोदींवर टीका करताना म्हटले आहे की, ‘आमचा ग्राहक’ अडचणीत आहे. अमेरिकन नेतृत्व कसे व्यावसायिक म्हणून काम करते हे दिसून येते, असे ते म्हणाले. (Oppositions slammed PM)

‘‘आलिंगन देण्याने, हास्यविनोद करण्याने किंवा, ‘फिर एक बार ट्रम्प सरकार,’ अशा घोषणांनी काहीही साध्य होत नाही. अमेरिका एक व्यावसायिक आहे आणि आमच्या ग्राहकांचे शोषण होणार आहे, ’’ असे खरगे म्हणाले. पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी भूतकाळातील कौतुकाचा संदर्भ देत खरगे यांनी ही टीका केली.

काँग्रेस लवकरच या मुद्द्यावर सविस्तर निवेदन प्रसिद्ध करेल, असे ते म्हणाले.

काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी अतिरिक्त कर हा केंद्र सरकारचे अपयश असल्याचे म्हटले आहे.

‘‘अमेरिकेने पुढे जाऊन जे करायचे होते ते केले आहे. त्याबरोबरच, भारतीय विद्यार्थ्यांचे व्हिसा मोठ्या प्रमाणात रद्द केले जात आहेत भारत सरकार मात्र त्यावर आवाज उठवत नाही,’’ असा आरोप त्यांनी केला. (oppositions slammed PM)

टीएमसीच्या राज्यसभेच्या खासदार सागरिका घोष यांनीही मोदी सरकारवर टीका केली. या करामुळे कापड, अभियांत्रिकी आणि रत्ने आणि दागिने यांसारख्या प्रमुख भारतीय उद्योगांवर नकारात्मक परिणाम होईल आणि लाखो कामगारांच्या रोजीरोटीवर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त केली.

हेही वाचा :
मोदी मित्र, तरीही भारतावर २६ टक्के कर  
भारतातील टेक्स्टाईल, जेम्स ॲण्ड ज्वेलरी उद्योगांना फटका
पेंग्विननाही द्यावा लागणार ट्रम्प कर!

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00