Home » Blog » OPP Attacks: लोणीकर, माफी मागा!; विधिमंडळात गदारोळ

OPP Attacks: लोणीकर, माफी मागा!; विधिमंडळात गदारोळ

by प्रतिनिधी
0 comments
OPP Attacks

मुंबई : विशेष प्रतिनिधी : माजी मंत्री व भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या विरुद्ध केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे पडसाद बुधवारी (२ जून) पुन्हा विधिमंडळात उमटले. लोणीकरांनी माफी मागितलीच पाहिजे, अशी मागणी करत महाविकास आघाडीचे सदस्य आक्रमक झाले. (OPP Attacks)

लोणीकरांनी माफी मागितलीच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका घेत त्यांनी सरकारला धारेवर धरले. त्यामुळे झालेल्या गदारोळात विधानसभा दोनदा तहकूब करावी लागली. याबाबत लोणीकर यांनी स्पष्टीकरण देताना, आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. शेतकऱ्यांची आपण हजारवेळा माफी मागू पण विरोधकांची माफी मागणार नसल्याचे सांगितले. ऑपरेशन सिंदूरबद्दल आक्षेप घेणाऱ्यांनी पहिल्यादा माफी मागावी, असे प्रत्युत्तर भाजपा आणि महायुतीच्या आमदारांनी दिले. (OPP Attacks) ‘मी जे बोललो नाही ते मी बोललो,’ असा आरोप करत त्यांनी ह्यात राजकारण असल्याचा दावा त्यांनी केला. महाविकास आघाडीने त्याला तीव्र आक्षेप घेतला. त्यामुळे सायंकाळी दहा मिनिटासाठी कामकाज स्थगित करण्यात आले.
याबाबत चर्चेत बोलताना काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे भाजपा आणि लोणीकर यांच्यावर कडाडून टीका करत माफीची मागणी केली. महाविकास आघाडीच्या आमदारांनी लोणीकर यांनी माफी मागावी अशी मागणी केली. प्रचंड घोषणाबाजी सुरू झाल्यामुळे कामकाज दुसऱ्यादा दहा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00