Home » Blog » ‘एक राष्ट्र, एक निवडणूक,’ चालू अधिवेशानातच

‘एक राष्ट्र, एक निवडणूक,’ चालू अधिवेशानातच

केंद्रीय मंत्रिमंडळाची विधेयकाला मंजुरी

by प्रतिनिधी
0 comments
One Nation One Election

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी दिली. हे विधेयक संसदेच्या चालू अधिवेशनातच मांडले जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे (जेपीसी) पाठवले जाईल. लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याबाबतचे हे विधेयक सरकारच्या अजेंड्यावर आहे. (One Nation One Election)

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती नेमली होती. या समितीने अहवालावर आधारीत प्रस्तावाला सप्टेंबरमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रस्तावाचे स्वागत करताना ‘मंत्रिमंडळाने एकाचवेळी निवडणुकांबाबत उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी स्वीकारल्या आहेत,’ असे स्पष्ट केले.

कोविंद यांच्या नेतृत्वाखालीलउ उच्यस्तरीय समितीने लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाचवेळी घेण्याची शिफारस केली होती. त्यानंतर शंभर दिवसांच्या आत समक्रमित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात, असे म्हटले आहे.

दरम्यान, कोविंद यांनी ‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ या विषयावर एकमत घडवण्याचे आवाहन केले आहे. बुधवारी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले होते की, केंद्राने ‘वन नेशन, वन इलेक्शन’वर एकमत घडवले पाहिजे. (One Nation One Election)

‘केंद्र सरकारला त्यासाठी प्रयत्न करून सर्वांची सहमती घ्यावी लागेल. हा मुद्दा कोणत्याही एका पक्षाच्या हिताचा नाही; तर तो देशाच्या हिताचा आहे. ‘वन नेशन, वन इलेक्शन’ गेम चेंजर ठरेल. हे माझे मत नाही तर अर्थतज्ज्ञांचे मत आहे. त्याच्या अंमलबजावणीनंतर देशाचा जीडीपी एक ते दीड टक्क्यांनी वाढेल,’ याकडे कोविंद यांनी लक्ष वेधले.

वारंवार निवडणुकांमुळे वेळेचा आणि सार्वजनिक निधीचा अपव्यय होतो, असे सांगून केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही बुधवारी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाच वेळी घेण्यास पाठिंबा दर्शविला.

‘आपली लोकशाही आणखी चैतन्यशील आणि त्यातील व्यापक सहभागाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. आमचे माजी राष्ट्रपती, रामनाथ कोविंद यांना या समितीचे नेतृत्व केल्याबद्दल धन्यवाद देतो, असेही मोदी यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.

-पंतप्रधान नरेंद्र मोदी

हेही वाचा :

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00