Home » Blog » Newzealand Test : न्यूझीलंड विजयाच्या नजीक

Newzealand Test : न्यूझीलंड विजयाच्या नजीक

इंग्लंडला हव्या आणखी ६४० धावा

by प्रतिनिधी
0 comments

हॅमिल्टन : न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यामध्ये तिसऱ्या दिवशी विजयानजीक पोहोचला आहे. सोमवारी केन विल्यमसनने झळकावलेल्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने दुसऱ्या डावामध्ये ४५३ धावा करून इंग्लंडपुढे विजयासाठी ६५८ धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर, इंग्लंडने दिवसअखेरपर्यंत दुसऱ्या डावामध्ये २ बाद १८ धावा केल्या होत्या. विजयासाठी इंग्लंडला आणखी ६४० धावा हव्या असून न्यूझीलंडला ८ विकेटची आवश्यकता आहे. (Newzealand Test)

न्यूझीलंडने पहिल्या डावात २०४ धावांची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावामध्ये ३ बाद १३६ धावा केल्या होत्या. सोमवारी विल्यमसनने रचिन रवींद्रसोबत शतकी आणि डॅरेल मिचेलसोबत ९२ धावांची भागीदारी रचून न्यूझीलंडला सव्वातीनशे धावांपलीकडे पोहोचवले. विल्यमसनने वर्षातील चौथे आणि कारकिर्दीतील ३३ वे कसोटी शतक पूर्ण करताना २० चौकार व एका षटकारासह १५६ धावांची खेळी केली. मिचेलने ८४ चेंडूंमध्ये ७ चौकार व २ चौकारांसह ६० धावा केल्या. तळातील टॉम ब्लंडेल (४४ धावा) आणि मिचेल सँटनर (४९ धावा) यांच्या फटकेबाजीमुळे न्यूझीलंडला ४५३ धावांपर्यंत मजल मारता आली. इंग्लंडतर्फे जेकब बॅथलने तीन विकेट घेतल्या. (Newzealand Test)

अखेरच्या सत्रात फलंदाजीस आलेल्या इंग्लंडने अवघ्या ६ षटकांमध्ये २ विकेट गमावल्या. सलामीवीर झॅक क्रॉली आणि बेन डकेट हे झटपट बाद झाले. खेळ थांबला, तेव्हा बॅथेल ९, तर जो रूट शून्य धावांवर खेळत होते. (Newzealand Test)

विल्यमसनचा अनोखा विक्रम

केन विल्यमसनने सोमवारी हॅमिल्टनच्या सेडन पार्क स्टेडियमवर खेळलेल्या सलग पाचव्या कसोटीत शतक साजरे केले. एकाच मैदानावर सलग पाच कसोटींमध्ये शतके झळकावणारा तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलाच फलंदाज ठरला. यापूर्वी, चौदा फलंदाजांनी एकाच मैदानावर सलग चार कसोटींमध्ये शतके झळकावण्याचा विक्रम केला आहे. डॉन ब्रॅडमन यांनी मेलबर्न आणि लीड्स या दोन मैदानांवर सलग चार कसोटींमध्ये शतके केली आहेत.

हेही वाचा :

सोळावर्षीय कमिलिनी बनली कोट्यधीश
सईद मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धे मुंबईने जिंकली

 

https://www.espncricinfo.com/series/england-in-new-zealand-2024-25-1428550/new-zealand-vs-england-3rd-test-1428556/full-scorecard

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00