Home » Blog » MSRTC on action mode:बसस्टँड, आगारांच्या सुरक्षा व्यवस्थेचे ऑडिट

MSRTC on action mode:बसस्टँड, आगारांच्या सुरक्षा व्यवस्थेचे ऑडिट

स्वारगेट प्रकारानंतर एसटी महामंडळाला जाग

by प्रतिनिधी
0 comments
MSRTC on action mode

मुंबई : प्रतिनिधी : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकातील बसमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाला जाग आली आहे. राज्यातील सर्वच बसस्थानक आणि आगारांचे तातडीने सुरक्षा लेखापरीक्षण (सिक्युरिटी ऑडिट) करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे याठिकाणी पडून असलेल्या नादुरुस्त बसेस व आरटीओने जप्त केलेली वाहने १५ एप्रिलपर्यंत हटविण्याचे निर्देश गुरुवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिले.(MSRTC on action mode)

बुधवारी घडलेल्या घटनेमुळे राज्यभरातून तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पुण्यातील सुरक्षा व्यवस्थेचे धिडवडे निघाले आहेत. घटनेला तीन दिवस होत आले तरी अद्याप आरोपी सापडलेला नाही. या प्रकारामुळे एसटी आगार व स्थानकातील सुरक्षा व्यवस्था चव्हाट्यावर आली आहे. त्याबाबत विरोधी पक्षबरोबरच सामाजिक संघटना व सर्वसामान्य नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आता ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहे.(MSRTC on action mode)

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी (२७ फेब्रुवारी) परिवहन अपर मुख्य सचिव व व एसटी महामंडळाचे अध्यक्ष संजय सेठी यांच्या दालनात वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली. राज्यातील सर्व बस स्थानके व आगारातील सुरक्षा व्यवस्थेचे लेखापरीक्षण करण्याचे निर्देश दिले. (MSRTC on action mode)

महिला प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता बसस्थानकावर सुरक्षा रक्षकांमध्ये महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्याच्या सूचनाही  दिल्या. परिवहन महामंडळाकडे मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्याचे  रिक्तपदावर अधिकाऱ्याची तातडीने नियुक्ती करण्याबाबतचा प्रस्ताव गृह विभागाला विनाविलंब सादर करण्यास सांगितले.

बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय (प्रभारी) विवेक भीमनवार, सहसचिव राजेंद्र होळकर, उपस्थित होते.

अद्ययावत यंत्रणा उभारा

यावेळी परिवहन मंत्री म्हणाले, राज्यभरात सर्वच एसटी बसस्थानके व आगारांमध्ये सीसीटीव्हीची एआय तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत यंत्रणा उभारण्यात यावी. नवीन येणाऱ्या बसेसमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात यावे.  बसेसमध्ये जीपीएस यंत्रणा बसविण्याचे काम गतीने पूर्ण करण्यात यावे. याबरोबरच बसस्थानकावर काम करणाऱ्या प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याला त्याचे ओळखपत्र देण्यात यावे, जेणेकरून कर्मचारी असल्याचे भासवून प्रवाशांना कोणी लुबाडणार  नाही. (MSRTC on action mode)

तसेच बसस्थानक अथवा आगारांमध्ये आलेल्या प्रत्येक बसची नोंदणी सुरक्षा रक्षकाकडे होणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच चालक – वाहक यांनी आगारात त्यांनी आणलेली बस सोडताना ती बंद असल्याची खात्री करावी. बसचे दरवाजे बंद करण्याची काळजी घ्यावी व साध्या बसेसमध्ये दरवाजासह खिडक्याही बंद असल्याची खात्री करावी.

स्वच्छतेलाही प्राधान्य द्या

बसस्थानकांवर स्वच्छतेबाबत कुठलीही तडजोड नसावी. प्रवाशांना दर्जेदार सुविधा, प्रत्येक बसस्थानकावर महिलांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात यावी. ही स्वच्छतागृह प्रशस्त असावीत, एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वच्छतेचा वेळोवेळी आढावा घेण्याचे निर्देश  दिले.

हेही वाचा :

स्वारगेट प्रकरणातील आरोपीचा शोध ड्रोनच्या सहाय्याने

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00