मुंबई : प्रतिनिधी : शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी महाकुंभात स्नान केले नाही, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत महाकुंभला का गेले नाहीत? असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांना मारला आहे. (Mohan Bhagvat)
रविवारी सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चांगला समाचार घेतला. ते म्हणाले, शिंदे भ्रष्ट मंत्री, आमदारांच्या टोळीला घेऊन महाकुंभला गेले. तिकडून आल्यावर उद्धव ठाकरे महाकुंभला का गेले नाहीत. हिंदू असतील तर त्यांनी कुंभला जायला हवे होते. हा प्रश्न त्यांनी मोहन भागवत यांना विचारायला हवा होता असा टोला शिंदेना मारला. (Mohan Bhagvat)
ते म्हणाले, “मोहन भागवत कुंभला गेले आणि स्नान करत आहेत, असा एकही फोटो आणि व्हिडिओ पाहिला नाही. संघाचे इतर नेतेही प्रयागराजला अंघोळ करताना पुण्य प्राप्त करताना पाहिले नाहीत. अशा प्रकारच्या पुण्य प्राप्तीवर त्यांचा विश्वास नसावा” (Mohan Bhagvat)
ते म्हणाले, “आम्ही मोहन भागवत यांना फॉलो करतो. आमचे ठरले होते. मोहन भागवत अंघोळीला गेले की त्यांच्या पाठोपाठ आपण शाही स्नानाचा कार्यक्रम करायचा.पण भागवत गेले नाहीत. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे गेले. आम्ही त्यांच्या मागे काय जायचे? आमच्यासाठी मोहन भागवत हे हिंदूत्वाचे आदर्श पुरुष आहेत” (Mohan Bhagvat)
संजय राऊत म्हणाले, “ हेगडेवार, गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, रज्जू भैय्या, सुदर्शनजी या पैकी कुणाचेही कुंभच्या सोहळ्यात स्नान करतानाचे फोटो मी आयुष्यात पाहिलेले नाहीत. जोपर्यंत सरसंघचालक प्रयागराजला जात नाहीत आणि कुंभ स्नान करत नाही तोपर्यंत आपण थांबले पाहिजे. आपण त्यांच्या मार्गाने जायला पाहिजे असे आमचे ठरले होते. पण ते गेले नाहीत, म्हणून आमचा कार्यक्रम होऊ शकला नाही. त्यामुळे शिदेंनी नागपूरला जाऊन एक पत्रकार परिषद घ्यावी आणि सरसंघचालकांना विचारावे की आपण हिंदू आहात, आपण कुंभला का गेला नाहीत? त्यानंतर आमच्याकडे यावे’, असेही राऊत म्हणाले. (Mohan Bhagvat)
हेही वाचा :
शिंदेंच्या आणखी एका निर्णयाला फडणवीसांचा ब्रेक!
केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची जत्रेत छेडछाड