नवी दिल्ली : ‘जातीबद्दल बोलण्याची काही लोकांची फॅशन झाली आहे. गेल्या ३० वर्षांपासून ओबीसी खासदार ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याची मागणी करत आहेत. ज्यांना आज जातीवादाचा फायदा दिसतो, त्यांनी ओबीसी समाजाचा विचार केला नाही. आम्ही ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा दिला आहे,’ याकडे लक्ष वेधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना टोला लगावला.(Modi’s reply)
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर झालेल्या भाषणांना मोदी उत्तर देत होते.
या सभागृहाच्या माध्यमातून मला देशातील नागरिकांना महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की, अनुसूचित जातीतील एकाच कुटुंबातील एकाच वेळी ३ खासदार झाले आहेत का, अनुसूचित जमातील एकाच कुटुंबातील ३ खासदार एकाच वेळी होते का? त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात खूप फरक आहे, अशी टीकाही त्यांनी काँग्रेसवर केली. (Modi’s reply)
राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर हल्ला करताना, मोदी म्हणाले, ‘आमच्या सरकारने अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींना प्रत्येक क्षेत्रात जास्तीत जास्त संधी मिळतील हे सुनिश्चित करण्यासाठी काम केले आहे. काही लोकांच्या बोलण्यात आणि कृतीत फार मोठा फरक आहे. हा फरक जमीन-आकाशाएवढा आहे. त्यामुळे त्यांनी या समाजाबद्दलचा फुकटचा कळवळा दाखवू नये.’
परराष्ट्र धोरणावर बोलल्याशिवाय आपण पोक्त झालो नाही, असा काहींचा गैरसमज आहे. ज्यांना खरोखरच परराष्ट्र धोरणात मनापासून रस आहे त्यांना मी JFK’s Forgotten Crisis हे पुस्तक वाचण्याचा सल्ला देईन. तत्कालीन पंतप्रधान नेहरू आणि अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्यातील चर्चेचा हा महत्त्वाचा तपशील आहे. आव्हानात्मक काळात परराष्ट्र धोरण कसे हाताळले पाहिजे, याचे ते दिग्दर्शन करते, असे सांगत मोदी यांनी राहुल गांधी यांच्याकडे निर्देश केला. (Modi’s reply)
महिला राष्ट्रपतींचा अपमान : सोनियांना प्रत्युत्तर
मी राजकीय नैराश्य समजू शकतो, पण राष्ट्रपतींचा अपमान करण्याचे कारण काय, असा सवाल करून मोदी यांनी सोनिया गांधी यांच्यावरही टीकास्र सोडले. आज भारत अशी विकृत मानसिकता झुगारून देत पुढे जात आहे. महिलांच्या नेतृत्वाखाली विकासाचा मंत्र घेऊन आम्ही पुढे जात आहोत. निम्म्या लोकसंख्येला पूर्ण संधी मिळाली, तर भारत दुप्पट वेगाने पुढे जाऊ शकतो. माझा हा विश्वास अनेक वर्षे या क्षेत्रात काम केल्यानंतर अधिक दृढ झाला आहे, असे मोदी म्हणाले. (Modi’s reply)
‘India has had a big increase in the number of medical colleges that it went from 387 to 780 after 2014’: PM #NarendraModi
Track LIVE updates
https://t.co/bFkFrmoX2T#Parliament #BudgetSession #MotionOfThanks pic.twitter.com/j26q2YEFuq
— The Times Of India (@timesofindia) February 4, 2025
हेही वाचा :