Home » Blog » संविधानात बदलाचा मोदींचा कट उधळला

संविधानात बदलाचा मोदींचा कट उधळला

महायुतीच्या काळात राज्याची पीछेहाट झाल्याचा शरद पवार यांचा आरोप

by प्रतिनिधी
0 comments
sharad pawar file photo

लातूर : प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आबंडेकर यांच्या संविधानात बदल करण्याचा कट रचला होता; पण लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी यांच्यावर शहाणपणाचे पुन्हा निशाणा साधला. महायुतीच्या काळात राज्याची पीछेहाट झाल्याची टीका त्यांनी केली.

शरद पवार यांची शनिवारी उदगीर येथे सभा झाली. पवार यांनी पुन्हा एकदा मोदी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, की ५-६ महिन्यांपूर्वी आपण लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे गेलो. त्यावेळी  देशाचे राज्य गेल्या १० वर्षांपासून मोदी यांच्या हातात होते. देशातील शेतकरी वर्ग संकटात सापडला होता. त्याची अस्वस्थता घालवायची असेल, तर मोदी यांना हलवून जागे करण्याची गरज होती. त्यासाठी आम्ही काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या  नेतृत्वात विरोधी पक्षांची ‘इंडिया’ नावाची आघाडी स्थापन केली. त्यानंतर आम्ही लोकसभा निवडणुकीला सामोरे गेलो. मोदी यांना लोकसभा निवडणुकीत ४०० हून जास्त जागा हव्या होत्या. त्यांनी यासाठी ‘४०० पार’चा नारा दिला होता.

मोदी यांच्या घोषणेत काहीतरी पाप असल्याचा संशय आम्हाला आला होता. आमचा संशय अगदी खरा होता. या सरकारने डॉ. आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानात काही बदल करण्याचा डाव रचला होता. त्यातून जनतेच्या अधिकारांवर गदा येणार होती. हे कटकारस्थान पूर्ण करण्यासाठी मोदी व त्यांच्या सरकारला ४०० च्या आसपास जागांची गरज होती. मी महाराष्ट्रातील जनतेला धन्यवाद देऊ इच्छितो. येथील जनतेने मोदी व शहांना त्यांची जागा दाखवण्याचे काम केले. यामुळे संविधानात बदल करण्याचा कट उधळला गेला, असे ते म्हणाले.

आम्ही यासंबंधी अनेक निर्णय घेतले. शेतीवर आधारित कारखानदारीचे सूत्र अमलात आणले. त्याचा मोठा फायदा राज्याला झाला. विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वात लातूर जिल्हा मागे राहिला नाही, याचा मला आनंद आहे; पण आज अनेक कारखाने बंद पडले आहेत. त्यामुळे महायुतीच्या हातात सत्ता देणे हे शहाणपणाचे लक्षण नाही.

-शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00