Home » Blog » राजकारणातील चिखलाला उद्धव जबाबदार

राजकारणातील चिखलाला उद्धव जबाबदार

मनसे प्रमुख राज ठाकरे यांची टीका; बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी

by प्रतिनिधी
0 comments
Raj Thackeray File Photo

मुंबई : प्रतिनिधी : राज्याच्या राजकारणाचा जो चिखल झाला, त्याला उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्री व्हायचे, म्हणून त्यांनी जनतेचे मतदान नाकारून काँग्रेसशी बस्तान बांधले. बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी केली, असे ते म्हणाले.

आपली विचारप्रणाली सोडून दुसऱ्याच्या विचारप्रणालीत बसायचे, त्यानेही ती गोष्ट स्वीकाराची, अशी गोष्ट कधी पाहिली नाही. माझ्या शिवसेनेची काँग्रेस होताना दिसली, तर मी त्याच दिवशी दुकान बंद करेन असे बाळासाहेब म्हणाले; पण यांनी त्यांच्याच बाजूला दुकान मांडले. त्यांनी बाळासाहेबांच्या नावाच्या आधीचे हिंदुहृदयसम्राट काढून टाकले, अशा शब्दांत उद्धव यांच्यावर हल्ला चढवत ते म्हणाले, की उद्धव यांच्या व्यक्तिगत महत्वकक्षेतून हे झाले. मला स्वतःला मुख्यमंत्री व्हायचे यासाठी भाजपशी सौदा गेला.

मोदी, अमित शाह वेगवेगळ्या सभेत आमचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे सांगत होते, त्यावेळी का आक्षेप घेतला नाही? सुरुवातीला शरद पवार यांच्यांशी बोलायला सुरुवात केली. अजित पवार यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात टाकणार होते, त्यांच्यासोबत तुम्ही शपथविधी करता. इतक्या स्वार्थाने तुम्ही विचारप्रणालीला मागे सारले. लोकांनी मत दिले त्याला लाथाडले. याची जर महाराष्ट्राला चटक लागली तर राजकारण कुठे जाईल? उद्या या गोष्टी  वाढल्या तर कोण राहील इथे, अशी टीका करून राज म्हणाले, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी गोष्ट केली, ती अत्यंत योग्य केली. कारण तुम्ही विचारप्रणाली, बाळासाहेब सर्वांना बाजूला काढले. काँग्रेससोबत जाऊन बसणे हे कोणालाच पटले नसेल. इतकी वर्षे ज्यांना विरोध केला, त्यांच्यासोबत सत्तेत बसणे हे कोणालाच आवडले नाही. ही गोष्ट आधीच झाली असती; पण मध्ये कोविड आला, असे ते म्हणाले.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00