Home » Blog » Mitra : ‘मित्र’ संस्थेच्या उपाध्यक्षपदी आमदार क्षीरसागर यांची फेरनियुक्ती

Mitra : ‘मित्र’ संस्थेच्या उपाध्यक्षपदी आमदार क्षीरसागर यांची फेरनियुक्ती

वळसे पाटील, राणा पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड

by प्रतिनिधी
0 comments
Mitra

मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) या  संस्थेच्या संघटनात्मक रचनेमध्ये नियामक मंडळात उपाध्यक्षपदी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. आमदार दिलीप वळसे पाटील आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचीही नियुक्ती “उपाध्यक्ष” पदावर करण्यात आली आहे. (Mitra)

राज्याचा जलद व सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) या संस्थेची स्थापना करण्यास शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात आली. “मित्र” संस्थेच्या संघटनात्मक रचनेमध्ये नियामक मंडळात अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहअध्यक्षपदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार अशी पदरचना यापूर्वी करण्यात आली आहे. आज शासनामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने “मित्र” संस्थेच्या संघटनात्मक रचनेमध्ये नियामक मंडळात “उपाध्यक्ष” पदी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. यासह उपाध्यक्ष पदांची संख्या वाढवून आमदार दिलीप वळसे पाटील आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचीही नियुक्ती “उपाध्यक्ष” पदावर करण्यात आली आहे.  (Mitra)

याबाबत बोलताना आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, राज्याच्या जलद व सर्वसमावेशक विकासाचा भाग होणे ही माझ्यासाठी मोठी संधी असणार आहे. नियोजन विभागाच्या कामकाजाशी संलग्न अशी मित्र या संस्थेची कार्यपद्धती असल्याने मित्र या संस्थेच्या उपाध्यक्ष पदी फेरनियुक्ती झाल्याने मला माझी कार्यक्षमता सिद्ध करण्याची पुन्हा सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. यासह नियोजन विभागातील कार्यपद्धतीच्या अनुभवावर ही जबाबदारी निभावणे मला सोयीस्कर आहे. यापूर्वी या पदावर काम करताना राज्याच्या विकासाला चालना देण्यास उपाययोजीलेल्या उपक्रमांची दखल घेवून या पदावर फेरनियुक्ती झाली आहे.  मित्र संस्थेच्या झालेल्या नियुक्तीच्या माध्यमातून राज्याचा विकास साध्य करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचा, विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Mitra)

हेही वाचा :

मुख्यमंत्र्यांविरोधात निदर्शनावेळी कोल्हापुरात बळाचा वापर

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00