वॉशिंग्टन : लहरी हवामानाचा फटका पिकांना बसतो. वादळ, पाऊस आणि अचानक बदलणारे हवामान याचा अंदाज लावता येत नसल्यामुळे पिकांचे नुकसान होते. मात्र आता ही वेळ येणार नाही. कारण पिकांच्या लागवडीपासून ते कापणीपर्यंतची माहिती उपग्रहच देणार आहे. अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था-नासा आणि भारतीय अवकाश संशोधन संस्था-इस्रोचे निसार (NISAR) मिशन लवकरच लाँच होत आहे.(Mission NISAR)
सिंथेटिक एपर्चर रडार वापरून, ‘निसार’ पिकांची भौतिक वैशिष्ट्ये तसेच माती आणि वनस्पतीतील आर्द्रतेचे प्रमाण किती आहे ते समजणार आहे. या मोहिमेत शेतजमिनीच्या छोट्या छोट्या तुकड्यांवरील पिकपाण्याची स्थिती आणि मातीचे आरोग्य ओळखण्याची क्षमता यात असल्याने या उपग्रहामुळे मिळणाऱ्या माहितीचा मोठा फायदा कृषी क्षेत्राला होणार आहे. (Mission NISAR)
विशेष म्हणजे हा उपग्रह दर १२ दिवसांनी दोनदा पृथ्वीच्या जवळजवळ सर्व भूभागाची छायाचित्रे घेईल. त्यामुळे जवळपास ३० फूट (१० मीटर) रुंदीपर्यंतच्या भूखंडांवरील पीकस्थिती समजेल. हे फोटो हाय रिझोल्युशनचे असतील. ते झूम करून पाहिले तरी एखाद्या भागाचे चित्र स्पष्ट होणार आहे. हा फोटो झूम केल्यानंतर आपल्याला हवा असलेला भाग क्रॉप केला तरी त्याचे सर्व बारीक सारीक तपशील लक्षात येतील, इतकी त्याची उच्च गुणवत्ता असणार आहे. (Mission NISAR)
उदाहरणार्थ, निसारने पाठवलेला डेटा वापरून, एखाद्या प्रदेशात भात रोपे कधी लावली गेली याचा अंदाज लावता येईल. हंगामात त्यांची उंची आणि बहर किती आहे, त्याचबरोबर कालांतराने रोपे आणि भातातील ओल्यातेचे निरीक्षणही करता येईल. त्यानुसार पीक व्यवस्थापन करणे शक्य होईल.
पिकांबाबतीत वेळ खूप महत्त्वाची असते. लागवड आणि सिंचनासाठी सर्वांत चांगला काळ कोणता, याचे अचूक नियोजन आणि व्यवस्थापन जमले की पिके चांगली येतील. कृषीक्षेत्रात हा खेळ जमला पाहिजे,’ असे मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीमधील ‘निसार’ विज्ञान पथकाचे सदस्य आणि कृषी अभियांत्रिकी संशोधक नरेंद्र दास यांनी सांगितले. (Mission NISAR)
‘निसार’ने पाठवलेला डेटा पिकांच्या वाढीचे मॅपिंग, पिकांचे आरोग्य आणि मातीतील आर्द्रतेचे निरीक्षण करण्यासाठी वापरला जाईल. या डेटाचा उपयोग अचूक निर्णय घेण्यासाठी होईल.
‘इस्रो’च्या श्रीहरीकोटातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ‘निसार’चे प्रक्षेपण होणार आहे. प्रक्षेपण होईल तेव्हा उपग्रह प्रचंड डेटा पाठवत राहील. त्यामुळे जगभरातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. उपग्रह एकदा कार्यान्वित झाल्यानंतर, तो शेतीसह अनेक क्षेत्रांमधील संशोधक आणि वापरकर्त्यांसाठी दररोज सुमारे ८० टेराबाइट डेटा तयार करेल.
(इनपुट : नासा)
हेही वाचा :
ग्रीन कार्ड कायम वास्तव्याची हमी नव्हे
सरोगसीचा पर्याय ५१ वर्षांपर्यंत