Home » Blog » Missing in Stampede: हरवलेल्यांच्या शोधांत धास्तावलेले चेहरे…

Missing in Stampede: हरवलेल्यांच्या शोधांत धास्तावलेले चेहरे…

दिल्लीतीतील चेंगराचेंगरीनंतर नातेवाईकांची धावपळ

by प्रतिनिधी
0 comments
Missing in Stampede

नवी दिल्ली : दिल्ली रेल्वे स्थानकावर रविवारी झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अनेकजण बेपत्ता झाले आहेत. त्यांचे नातेवाईक त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेत हरवलेल्या लोकांचे नातेवाईक धास्तावलेल्या चेहऱ्याने त्यांचा शोध घेत आहेत. पोलीस ठाणे, या रुग्णायापासून त्या रुग्णालयाकडे धावपळ करत आहेत. ज्यांच्याकडे आपल्या हरवलेल्या नातेवाईकाचा फोटो आहे, ते तो दाखवत पोलीस आणि रुग्णालय प्रशासनाच्या दारात केविलवाण्या अवस्थेत चौकशी करतानाचे चित्र मन विदीर्ण करून टाकत आहेत.( Missing in Stampede)

अनेकांनी यंत्रणांचा वाईट अनुभव येत असल्याचे सांगितले. त्यामुळे नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी मोठ्या आशेने आलेल्यांच्या पदरी निराशाच पडत आहे.

शनिवारी रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीतील जखमींना लोक नायक जय प्रकाश नारायण रुग्णालय (एलएनजेपी) आणि लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. ( Missing in Stampede)

रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी कुटुंबीयांसाठी तिथे दाखल झालेल्या जखमींची यादी लावली आहे. त्यांच्या नातेवाईकांचे नाव नसेल तर त्यांना तेथून परत पाठवले जात आहे. असे निराशाजनक चित्र असतानाच दुसरीकडे ‘मिसिंग’ची तक्रारही नोंद करून घेतली जात नाही, असे सांगण्यात आले.

एलएनजेपी रुग्णालयाबाहेर, भोला साह पत्नी मीना यांचा फोटो मोबाईलवर दाखवत होते. त्या या घटनेनंतर बेपत्ता झाल्या आहेत.

‘ती काल संध्याकाळी रेल्वे स्थानकावर महाकुंभसाठी प्रयागराजला जाण्यासाठी गेली होती. तिच्याकडे तिकिट नव्हते. तिच्यासोबतच्या ४-५ मैत्रिणीही बेपत्ता आहेत. त्यांचे मोबाईलही लागत नाहीत,’ अशी अगतिकता साह यांनी व्यक्त केली. ( Missing in Stampede)

चेंगराचेंगरीत जे मृत्यू झाले होते आणि ज्यांचे मृतदेह येथे आणले होते ते सर्व ज्यांच्या त्यांच्या नातेवाईकांनी नेले असल्याचे रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना  सांगितले.

मोअझम हेही अशांपैकी एक. ते त्याच्या मित्रांसोबत, त्यांचे बेपत्ता भाऊ नदीम यांचा शोध घेण्यासाठी एलएनजेपी रुग्णालयात चौकशीसाठी आले होते.

स्वतंत्रता सेनाने एक्स्प्रेसने तो दरभंगाला घरी जात होता. त्याच्याकडे मोबाईलही नाही. त्याची ट्रेन शनिवारी रात्री प्लेटफॉर्म क्र. १३ वरून सुटणार होती. त्याचे काही काही बरेवाईट तर घडले नसेल, अशी भीती मोअझम यांनी बोलून दाखवली.

त्यांनाही साह यांच्यासारखेच उत्तर मिळाले. तिथे मृतदेह नाहीत. मी दाखल झालेल्या जखमींमध्ये माझ्या भावाचा शोध घेतो, अशी विनंती त्यांनी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना केली. मात्र त्यांना परवानगी मिळाली नाही. त्यामुळे ते आता दुसऱ्या रुग्णालयात जाऊन त्याच्या भावाचा शोध घेण्यासाठी निघत होते. ( Missing in Stampede)

नवी दिल्लीच्या अर्चना सुमन यांना मात्र त्यांचा भाऊ एलएनजेपी रुग्णालयात सापडला. तो या घटनेत जखमी झाला आहे.

‘काल, माझा भाऊ ट्रेन पकडायला गेला होता. मात्र आमच्या कानावर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीची बातमी धडकली. आम्ही घाबरलो आणि लगेच स्टेशनवर पोहोचलो. मात्र तिथे तो सापडला नाही. त्यामुळे धास्ती होती,’ असे त्यांनी सांगितले.

काही तासांनी फोन आला. भाऊ एलएनजेपी रुग्णालयात दाखल असल्याचे समजले. रुग्णालयात पोहोचल्यावर तो जखमी असल्याचे पाहिले, असे त्यांनी सांगितले. ( Missing in Stampede)

चेंगराचेंगरीनंतर मोठ्या संख्येने जखमींना आणल्यामुळे एलएनजेपी रुग्णालयाची व्यवस्था कडक करण्यात आली होती. त्यामुळे फक्त जखमींच्या सोबत असलेल्यांनाच आत जाण्याची परवानगी होती.

अणु कुमारीसाठी शनिवारची रात्र काळरात्रच ठरली. तिची भाची स्नेहा कसल्यातरी अडचणीत असल्याचे ऐकून ती रात्र त्यांनी अत्यंत भीतीदायक वातावरणात घालवली. ( Missing in Stampede)

स्नेहा उत्तर प्रदेशातून अणुच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आली होती. आम्ही मध्यरात्री तातडीने रुग्णालयाकडे धाव घेतली. तेव्हा समोरचे दृश्य पाहून हादरून गेलो. स्नेहा जखमी आणि बेशुद्धावस्थेत होती, असा भीतीदायक अनुभव त्या सांगतात.

हेही वाचा :

नवी दिल्लीला भूकंपाचे धक्के
दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी; १८ प्रवासी ठार

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00