Home » Blog » मॅथ्यू वेडची क्रिकेटमधून निवृत्ती

मॅथ्यू वेडची क्रिकेटमधून निवृत्ती

पाकिस्तानविरूद्ध मालिकेत प्रशिक्षकाच्या भूमिकेत

by प्रतिनिधी
0 comments
Matthew Wade file photo

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क :  ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर फलंदाज मॅथ्यू वेडने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याच्या या निर्णयामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. २०२१ साली झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत त्याने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत सामन्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्याच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत टी-विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. (Matthew Wade)

मॅथ्यू वेडने २०११ साली ऑस्ट्रेलियाकडून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. वेडने आपल्या कारकीर्दीत संघासाठी ९२ सामन्यांमध्ये तीन अर्धशतक झळकावत १२०२ धावा केल्या आहेत. वेडने २०२१ साली झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली होती. त्याने पाकिस्तानविरूद्घच्या अंतिम सामन्याच्या १९ व्या षटकात शाहीन आफ्रिदीला तीन षटकार लगावून गमावलेला सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने फिरवला होता. या सामन्यात त्याने १७ चेंडूंत २ चौकार आणि ४ षटकारांसह ४१ धावा केल्या होत्या.

व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये दिसणार वेड

निवृत्तीनंतर वेड टास्मानिया आणि होबार्ट हरिकेन्स तसेच काही परदेशी लीगमध्ये खेळणार आहे. याशिवाय निवृत्तीनंतर वेडने कोचिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी त्याला ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. (Matthew Wade)

निवृत्तीची घोषणा करताना वेड म्हणाला की, काही वर्षांपासून मी चांगली कामगिरी करत होतो. फिनिशर म्हणून मी सातव्या क्रमाकांवर फलंदाजी करावी अशी संघाची इच्छा होती. यामुळे मी सातव्या क्रमांकावर फलंदाजी केली. टी-२० विश्वचषकानंतर मला समजले की माझ्या क्रिकेट कारकीर्दीला पूर्णविराम देण्याची आता योग्य वेळ आली आहे.

मॅथ्यू वेडची कारकिर्द

वेडने आपल्या १३ वर्षांच्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियासाठी ३६ कसोटी सामन्यांमध्ये १६१३ धावा केल्या आहेत. यात त्याने नावावर ४ शतके झळकावली आहेत. याशिवाय वेडने ९२ एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण १८६७ धावा केल्या आहेत.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00