Home » Blog » Match Abandoned : ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका सामना रद्द

Match Abandoned : ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका सामना रद्द

दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण

by प्रतिनिधी
0 comments
Match Abandoned

रावळपिंडी : चॅम्पियन्स ट्रॉफी वन-डे क्रिकेट स्पर्धेच्या ‘ग्रुप बी’मधील ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला आहे. (Match Abandoned)

रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना दिवसरात्र खेळवण्यात येणार होता. तथापि, मंगळवारी सकाळपासूनच रावळपिंडीमध्ये पावसाची संततधार असल्याने स्टेडियमवर आवरण अच्छादण्यात आले होते. सामन्याच्या नियोजित वेळी दुपारी २ वाजता पाऊस सुरू असल्याने सामन्यास सुरुवात होऊ शकली नाही. सायंकाळी साडेसातपर्यंत पाऊस थांबून स्टेडियम खेळण्यायोग्य बनल्यास दोन्ही संघांदरम्यान किमान २० षटकांचा सामना खेळवता येणार होता. तथापि, सायंकाळी पाचपर्यंत पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे मैदानावर काही ठिकाणी पाणी साचले होते. पाऊस थांबण्याची चिन्हे नसल्याने मैदान खेळण्यायोग्य बनवणे ग्राउंडस्टाफला शक्य होणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे, पंचांनी मैदानाची पाहणी केल्यानंतर सामना रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. (Match Abandoned)

हा सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला आहे. परिणामी, ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेचे प्रत्येकी ३ गुण झाले आहेत. या दोन्ही संघांनी चॅम्पियन्स ट्रॉफीतील त्यांच्या सलामीच्या सामन्यात विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला, तर दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला पराभूत केले होते. ‘ग्रुप बी’च्या गुणतक्त्यात सरस धावगतीमुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ अव्वलस्थानी असून ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाची साखळी फेरीतील अखेरची लढत २८ फेब्रुवारी रोजी अफगाणिस्तानशी होणार असून दक्षिण आफ्रिकेचा १ मार्च रोजी इंग्लंडशी सामना होणार आहे. (Match Abandoned)

हेही वाचा :

ब्रायडन कार्स चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर

नेदरलँड्सची भारतावर मात

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00