Home » Blog » स्वप्नील कुसाळेला अर्जून पुरस्कार

स्वप्नील कुसाळेला अर्जून पुरस्कार

मनू भाकर, डी. गुकेश, हरमनप्रीत सिंग, प्रवीण कुमार यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार

by प्रतिनिधी
0 comments
Khel Ratna Award

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : आज (दि.२) क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२४ जाहीर केले. यात पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत दोन पदके जिंकणाऱ्या मनू भाकरला क्रीडा मंत्रालयाने खेलरत्न पुरस्कार जाहीर केला. मनू भाकरसह जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश, हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा ॲथलीट प्रवीण कुमार यांना खेल रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. तर कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेसह ३२ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.  स्वप्निल कुसाळेने ५० मीटर रायफल थ्री पोझिशन शुटिंगमध्ये कांस्य पदक पटकावले होते.  (Khel Ratna Award )

१७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११: ०० वाजता राष्ट्रपती भवन येथे एका विशेष समारंभात पुरस्कार विजेत्यांना भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

१७ पॅरा अॅथलीट्सचा समावेश

गेल्या महिन्यात झालेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावून गुकेश सर्वात तरूण चॅम्पियन बनला होता. तर हरमनप्रीत सिंगने ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व करत सलग दुसरे कांस्य पदक पटकावले. तर पॅरालिम्पिक उंच उडीपटू प्रवीणने २.०८ मीटरच्या विक्रमी उडीसह सुवर्णपदक जिंकले. अर्जुन पुरस्कारासाठी जाहीर करण्यात आलेल्या ३२ खेळाडूंच्या यादीत १७ पॅरा ॲथलीट्सचा समावेश आहे. (Khel Ratna Award )

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदकांची कमाई करून खेल रत्न पुरस्कार न मिळाल्याने मनू भाकर नाराज होती. मनूने दावा केला होता की, तिने खेल रत्न पुरस्कारासाठी ऑनलाईन पोर्टलवर तिचे नाव पाठवले होते, तरीही ती ३० खेळाडूंच्या यादीत तिचे नाव शॉर्टलिस्टमध्ये आले नव्हते. मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्य पदके जिंकली होती. १० मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक प्रकारात आणि मिश्र दुहेरीमध्ये ती तिसऱ्या क्रमांकावर राहिली होती.

ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झालेले खेळाडू

  • डी गुकेश (बुद्धिबळ)
  • हरमनप्रीत सिंग (हॉकी)
  • प्रवीण कुमार (पॅरा ॲथलेटिक्स)
  • मनू भाकर (शूटिंग)

अर्जुन पुरस्कार जाहीर झालेले खेळाडू

  • ज्योती याराजी (ॲथलेटिक्स)
  • अन्नू राणी (ॲथलेटिक्स)
  • नीतू (बॉक्सिंग)
  • स्वीटी (बॉक्सिंग)
  • वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ)
  • सलीमा टेटे (हॉकी)
  • अभिषेक (हॉकी)
  • संजय (हॉकी)
  • जर्मनप्रीत सिंग (हॉकी)
  • सुखजित सिंग (हॉकी)
  • राकेश कुमार (पॅरा तिरंदाजी)
  • प्रीती पाल (पॅरा ॲथलेटिक्स)
  • जीवनजी दीप्ती (पॅरा ॲथलेटिक्स)
  • अजित सिंग (पॅरा ॲथलेटिक्स)
  • सचिन सर्जेराव खिलारी (पॅरा ॲथलेटिक्स)
  • धरमबीर (पॅरा ॲथलेटिक्स)
  • प्रणव सुरमा (पॅरा ॲथलेटिक्स)
  • एच होकातो सेमा (पॅरा ॲथलेटिक्स)
  • सिमरन जी (पॅरा ॲथलेटिक्स)
  • नवदीप (पॅरा ॲथलेटिक्स)
  • नितेश कुमार (पॅरा बॅडमिंटन)
  • तुलसीमाथी मुरुगेसन (पॅरा बॅडमिंटन)
  • नित्य श्री सुमती सिवन (पॅरा बॅडमिंटन)
  • मनीषा रामदास (पॅरा बॅडमिंटन)
  • कपिल परमार (पॅरा ज्युदो)
  • मोना अग्रवाल (पॅरा नेमबाजी)
  • रुबिना फ्रान्सिस (पॅरा नेमबाजी)
  • स्वप्नील सुरेश कुसाळे (शूटिंग)
  • सरबज्योत सिंग (शूटिंग)
  • अभय सिंग (स्क्वॉश)
  • साजन प्रकाश (पोहणे)
  • अमन (कुस्ती)

क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार (आजीवन)

  • सुचा सिंग (ॲथलेटिक्स)
  • मुरलीकांत राजाराम पेटकर (पॅरा-स्विमिंग)

द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित श्रेणी)

  • सुभाष राणा (पॅरा-शूटिंग)
  • दीपाली देशपांडे (शूटिंग)
  • संदीप सांगवान (हॉकी)

द्रोणाचार्य पुरस्कार (आजीवन श्रेणी)

  • एस. मुरलीधरन (बॅडमिंटन)
  • अरमांडो ऍग्नेलो कोलाको (फुटबॉल)

राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार

  • फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया

मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA) ट्रॉफी २०२४

  • चंदिगड विद्यापीठ (एकूणच विजेते विद्यापीठ)
  • लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (प्रथम उपविजेते विद्यापीठ)
  • गुरु नानक देव विद्यापीठ, अमृतसर (द्वितीय रनर अप विद्यापीठ)

हेही वाचा :

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00