Home » Blog » Literary awards : प्रा. डॉ. प्रकाश पवार, एकनाथ पाटील यांना राज्य वाङ्मय पुरस्कार

Literary awards : प्रा. डॉ. प्रकाश पवार, एकनाथ पाटील यांना राज्य वाङ्मय पुरस्कार

ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

by प्रतिनिधी
0 comments
Literary awards

मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्यावतीने स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांना २०२४ सालासाठीचा ‘विंदा’ करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. १० लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. लक्षणीय साहित्य निर्मितीसाठी प्रकाशन संस्थांना देण्यात येणारा पुरस्कार श्री.पु. भागवत पुरस्कार पुण्याच्या ज्योत्स्ना प्रकाशन संस्थेला जाहीर झाला आहे. पाच लाख रुपये रोख मानपत्र आणि मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहेत. (Literary awards)

प्रौढ वाङ्मय पुरस्कारांमध्ये एकनाथ पाटील यांच्या ‘अरिष्टकाळाचे भयसूचन’ या काव्यसंग्रहाला तर इतिहासविषयक लेखनाविषयीचा शाहू महाराज पुरस्कार शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागातील प्राध्यापक आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. प्रकाश पवार यांच्या ‘राजमाता जिजाऊ’ या पुस्तकाला जाहीर झाला आहे. प्रत्येकी एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. (Literary awards)

याशिवाय बाल वाङ्मय पुरस्कार प्रत्येकी ५०,००० रुपये, प्रथम प्रकाशन – प्रत्येकी ५०,०००, सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कारांचीही (१,००,००० रुपये)चीही घोषणा करण्यात आली.

प्रौढ वाङ्मय पुरस्कार विजेते
  • काव्य – कवी केशवसुत पुरस्कार – एकनाथ पाटील (अरिष्टकाळाचे भयसूचन)
  • नाटक/एकांकिका – राम गणेश गडकरी पुरस्कार – मकरंद साठे (प्रस्थान ऊर्फ एक्झिट)
  • कादंबरी – हरी नारायण आपटे पुरस्कार – आनंद विंगकर (दस्तावेज)
  • लघुकथा – दिवाकर कृष्ण पुरस्कार – दिलीप नाईक निंबाळकर (अंत्राळी)
  • विनोद – श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार – शेखर गायकवाड (प्रशासकीय योगायोग)
  • ललितगद्य – अनंत काणेकर पुरस्कार –अंजली जोशी (गुरु विवेकी भला)
  • चरित्र – न. चिं. केळकर पुरस्कार – विवेक गोविलकर (स्टीव्हन हॉकिंग)
  • आत्मचरित्र – लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार – डॉ. वसंत भा. राठोड (कल्लोळ)
  • समीक्षा/संशोधन – के. क्षीरसागर पुरस्कार – समीर चव्हाण (अखईं ते जालें : तुकाराम : हिंदुस्तानी परिवेशात)
  • इतिहास – शाहू महाराज पुरस्कार – प्रकाश पवार (राजमाता जिजाऊ)
  •  उपेक्षितांचे साहित्य-  लोकशाहीर  अण्णा भाऊ साठे पुरस्कार-  सुनीता  सावरकर (ढोर-चांभार स्त्रियांच्या आंबेडकरी जाणिवांचा परिघ) (Literary awards)
  • भाषाशास्त्र/ व्याकरण- नरहर कुरंदकर पुरस्कार – उज्ज्वला जोगळेकर- मराठीतील संयुक्त तर्कसूचक अव्यये फ्रेंच सिद्धांतांच्या प्रकाशात
  • विज्ञान व तंत्रज्ञान- महात्मा जोतीराव फुले पुरस्कार – सुबोध जावडेकर- (दु)र्वतनाचा वेध
  • शेती व शेतीववषयक पूरक व्यवसाय लेखनासह- वसंतराव नाईक पुरस्कार – डॉ. ललिता विजय बोरा अन्नप्रक्रिया उद्योग: फळे भाज्या प्रक्रिया तंत्रज्ञान आणि उद्योग
  • तत्त्वज्ञान व मानसशास्त्र – ना. गो. नांदापूरकर पुरस्कार – या. रा.जाधव – जीव,जगत् आणि ईश्वर
  • शिक्षणशास्त्र – कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार – हेमंत चोपडे – शून्य-एक अनंत प्रवास
  • पर्यावरण – डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार – सह्याचला- आणि मी : एक प्रेम कहाणी
  • संपादित/ आधारित – रा. ना. चव्हाण पुरस्कार – संपादक रविमुकुल – मराठी भावसंगीत कोश (नाट्यगीत- भावगीत- चित्रपटगीत खंड १ व २)
  • अनुवादित – तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार – अनुवादक श्रीकांत अरुण पाठक – नाव नऊ कथांची कादंबरी
  • संकीर्ण (क्रीडासह) – भाई माधवराव बागल पुरस्कार – सुप्रिया राज – काश्मिरियत
बालवाङ्मय
  • कविता – बालकवी पुरस्कार – प्रशांत असनारे – मोराच्या गावाला जाऊया
  • नाटक व एकांकिका – भा. रा. भागवत पुरस्कार – संजय शिंदे – चार बालनाट्य
  • कादंबरी- साने गुरुजी पुरस्कार- रेखा बैजल- तुमचा आमचा संजू
  • कथा – (छोट्या गोष्टी, परिकथा, लोककथांसह)- राजा मंगळवेढेकर पुरस्कार – शरद आपटे- कोतवाल
  • सर्वसामान्य  ज्ञान (छंद व शास्त्रे) – यदुनाथ थत्ते पुरस्कार – डॉ. प्रमोद बेजकर – शरीराचे विलक्षण विज्ञान
  • संकीर्ण – ना. धो. ताम्हणकर पुरस्कार – डॉ. आनंद नाडकर्णी – वादळाचे किनारे…
प्रथम प्रकाशन
  • काव्य – बहिणाबाई चौधरी पुरस्कार – तान्हाजी रामदास बोऱ्हाडे  – जळताना भुई पायतळी
  • नाटक/ एकांकिका – विजय तेंडुलकर पुरस्कार – हरीश बोढारे – छिन्नी
  • कादंबरी – श्री. ना. पेंडसे पुरस्कार – प्रदीप कोकरे – खोल खोल दुष्काळ डोळे
  • लघुकथा – ग. ल. ठोकळ पुरस्कार – डॉ. संजीव कुलकणी – शास्त्रकाट्याची कसोटी
  • ललितगद्य – ताराबाई शिंदे पुरस्कार – गणेश मनोहर कुलकर्णी  –  रुळानुबंध
  • सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार
  • सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार – अनुवादक योगिनी मांडवगणे – आल्बेर काम्यू ला मिथ द -सिसीफ

अशोक केळकर पुरस्कार

डॉ. अशोक रा. केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार (व्यक्तींसाठी) डॉ. रमेश सीताराम सूर्यवंशी यांना तर संस्थेसाठी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाला तर  कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार (व्यक्तींसाठी) श्रीमती भीमाबाई जोंधळे यांना तर संस्थेसाठीचा पुरस्कार मराठवाडा साहित्य परिषद, छत्रपती संभाजीनगर या संस्थेला जाहीर करण्यात आला आहे. रूपये दोन लाख रोख, मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. (Literary awards)

हेही वाचा :

 

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00