Home » Blog » Ladaki Bahin : लाडक्या बहिणींना २६ जानेवारीपर्यंत हप्ता

Ladaki Bahin : लाडक्या बहिणींना २६ जानेवारीपर्यंत हप्ता

मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून स्पष्टता

by प्रतिनिधी
0 comments
Ladaki Bahin

मुंबई : प्रतिनिधी : राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा पुढील हप्ता २६ जानेवारीपर्यंत देण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी  दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. विधानसभा निवडणुकीनंतर ही योजना बंद होईल, अशी टीका विरोधकांकडून सुरू होती. मात्र योजनेचा हप्ता २६ जानेवारीला मिळणार असल्याने ही योजना पुढे सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Ladaki Bahin)

शुक्रवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पत्रकारांना माहिती दिली. त्या म्हणाल्या की, राज्य  शासनाने ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिला लाभार्थ्यांना जुलैपासून लाभ वितरीत करण्यास सुरुवात केली आहे.  त्यानुसार योजनेचा पुढील हप्ता २६ जानेवारीपर्यंत थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे (डीबीटी) पात्र लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात येणार आहे. यासाठी तीन हजार ६९० कोटी इतक्या रकमेला मंजुरी देण्यात आली आहे.(Ladaki Bahin)

निकषाबाबत अस्पष्टता कायम

लाडकी बहीण योजनेचा हप्ता केव्हा जमा होणार याकडे पात्र महिलांचे लक्ष लागले होते. त्यामुळे २६ जानेवारीपर्यंत हप्ता जमा होणार असल्याने योजनेबद्दलच्या शंकाकुशंकांना पूर्णविराम मिळाला आहे. तरीही पात्र महिलांचे निकष कसे असणार याबाबत सरकारने स्पष्टीकरण केलेले नाही. लाडकी बहीण योजना बंद करणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केले. या योजनेमुळे तिजोरीवर ताण येणार असल्याची भीती व्यक्त केली आहे. तरीही राज्य सरकारकडून या योजनेसाठी पात्र महिलांच्या कागदपत्रांची तपासणी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.(Ladaki Bahin)

हेही वाचा :
आठवा वेतन आयोग २०२६ पासून?

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00