Home » Blog » kumbh stampede: महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी, ३० भाविकांचा मृत्यू

kumbh stampede: महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी, ३० भाविकांचा मृत्यू

२५ जणांची ओळख पटली; अनेकजण जखमी

by प्रतिनिधी
0 comments
kumbh stampede

प्रयागराज (उत्तरप्रेदश ) : मौनी अमावस्येच्या मुहुर्तावर महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होऊन झालेल्या चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा मृत्यू झाला. शेकडो भाविक जखमी झाले आहेत. अनेकजण बेपत्ता आहेत. मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली. ( kumbh stampede)

चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांपैकी २५ जणांची ओळख पटली आहे. उर्वरित ५ जणांची ओळख पटवली जात आहे, असे ‘महाकुंभ’चे डीआयजी महाकुंभ वैभव कृष्णा यांनी संध्याकाळी अधिकृतरित्या सांगितले.

प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याचे आयोजन केले असून बुधवारी मौनी अमावस्येच्या मुहूर्तावर साधू-संत अमृतस्नान करणार होते. या अमृतस्नानाचा लाभ घेण्यासाठी देशभरातून लाखो भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहेत. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास प्रयाग संगमावर स्नान करण्यासाठी मोठी गर्दी झाली. त्यावेळी मोठी चेंगराचेंगरी झाली. त्यावेळी बॅरिकेड्स तुटलली. अनेक भाविक खाली पडले. त्यांना तुडवून लोक जीव वाचवण्यासाठी धावू लागले. ( kumbh stampede)

संगमावर आत येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते नसल्याने मोठी चेंगराचेंगरी झाली. काही भाविक जीव वाचवण्यासाठी बॅरिकेड्सवर चढले. त्यामुळे ती तुटली. त्यामुळे आणखी चेंगराचेंगरी झाली. अनेक जखमी विव्हळत पडले होते. ७० रुग्णवाहिकेतून जखमी भाविकांना उपचारास दाखल केले. चेंगराचेंगरीत अनेकांचे नातेवाईक बेपत्ता झाले आहेत. त्यामध्ये महिला, लहान मुलांचा समावेश आहे. अनेक भाविक आपल्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर एनएसजी कमांडोंनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सूत्रे हाती घेतली. ( kumbh stampede)

घटनास्थळी जखमी अवस्थेत अनेकजण विव्हळत पडले होते. अनेकजण जीवास मुकले आहेत. हे दृश्य हेलावून टाकणारे होते. प्रशासनाने १२ भाविकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले असले तरी अनेकांचे जीव गेला असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्नान झालेल्या भाविकांनी संगमावरुन निघून जावे असे आवाहन करण्यात आले. तसेच प्रयागराजमधून बाहेर जाणाऱ्या भाविकांसाठी जादा रेल्वे गाड्यांची सोय करण्यात आली आहे. प्रयागराजमध्ये अंदाजे एक कोटी भाविक आले असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. प्रयागराजच्या सीमा आता भाविकांसठी बंद करण्यात आल्या आहेत. ( kumbh stampede)

चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू करण्यास सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झालेल्या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

मोदींनी साधला योगींशी संवाद

दरम्यान, या घटनेची माहिती घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळपासून तीनदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संवाद साधला. परिस्थितीची माहिती घेतली. सातत्याने ते या घटनेचे अपडेट्स जाणून घेत आहेत.

अपुऱ्या व्यवस्थेमुळे दुर्घटना : काँग्रेस

“महाकुंभादरम्यान तीर्थराज संगमच्या काठावर झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक लोकांचे प्राण गेले आणि अनेक जण जखमी झाले, ही बातमी हृदयद्रावक आहे,” असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे. अर्धवट व्यवस्था, व्हीआयपींमुळे यंत्रणेवर वाढलेला तणाव यामुळे महाकुंभात चेंगराचेंगरी झाली आणि त्यामुळे अनेकांचे जीव गेले, असे काँग्रेसने म्हटले आहे. खरगे यांनी भाविकांच्या सुरक्षिततेसाठी धार्मिकस्थळी व्हीआयपींच्या दौऱ्यांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

मार्केटिंगपेक्षा सुरक्षिततेवर लक्ष द्यायला हवे : संजय राऊत
भाजपच्या श्रेयवादामुळे कुंभमेळ्यात भाविकांना प्राण गमवावे लागले, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी पक्षाच्या मार्केटिंगपेक्षा भाविकांच्या सुरक्षेवर लक्ष द्यायला हवे होते, असे मतही व्यक्त केले. भाजप आणि उत्तर प्रदेश सरकारने कुंभमेळ्याचे राजकीय मार्केटिंग केले. त्यात चुकीचे काही नाही. पण कुंभमेळा हा मार्केटिंगचा विषय नाही. दहा भाविकांचे प्राण गेल्यानंतर तातडीने बैठका सुरू झाल्या आहेत. घटनेनंतरच्या परिस्थितीवर पंतप्रधान आणि गृहमंत्री लक्ष ठेवून आहेत म्हणजे काय?, ज्यांनी प्राण गमावले आहेत ते परत येणार आहेत का ?असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा :
अमृत स्नान पूर्ववत

कुंभमेळ्याचा ४५ कोटी भाविकांचा आकडा कुठून आला?

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00