Home » Blog » Kolhapur City expansion : कोल्हापूर शहराची द्दवाढ दृष्टीक्षेपात : क्षीरसागर

Kolhapur City expansion : कोल्हापूर शहराची द्दवाढ दृष्टीक्षेपात : क्षीरसागर

by प्रतिनिधी
0 comments
Kolhapur City expansion

कोल्हापूर :  प्रतिनिधी : मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत  कोल्हापूर शहराची हद्दवाढीसंदर्भात बैठक झाली. बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पालकमंत्री प्रकाश आबिटकर, तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि सचिव उपस्थित होते. (Kolhapur City expansion)

या बैठकीत  बैठकीमध्ये  कोल्हापूर शहर हद्दवाढीची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. राजेश क्षीरसागर यांनी काढलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की,  मी महानगरपालिकेच्या आयुक्तांना, शहराशी एकरूप झालेली गावे हद्दवाडीमध्ये घ्यावीत अशा पद्धतीचे पत्र देत असून त्यानुसार महानगरपालिकेच्या आयुक्त,  जिल्हा परिषदेच्या सीईओ यांना विनंती करून संबंधित ग्रामपंचायतींना सदरची नोटीस काढतील, त्यानुसार संबंधित गावांची भूमिका आल्यानंतर हा प्रस्ताव शासनाला सादर होईल. त्यानंतर शासन निर्णय घेईल. (Kolhapur City expansion)

राजेश क्षीरसागर म्हणाले,   हद्दवाढ ही काळाची गरज असून ती जर झाली नाही तर जिल्ह्याचा विकास होणार नाही.  परंतु ग्रामीण भागातील नागरिक सुद्धा आमचे शत्रू नसून त्यांना विश्वासात घेऊनच त्या भागाचा विकास करणे गरजेचे आहे,  हीच भूमिका असल्याचे सांगून हा विषय कोणाच्याही भावना दुखावण्याचा नसून आपण जिल्ह्यात एकत्र राहणारी मंडळी जिल्ह्याच्या विकासाची गरज ओळखून हद्दवाढीसाठी सकारात्मक राहिले पाहिजे. ग्रामीण भागातील नागरिकांना विश्वासात घेऊनच कोल्हापूरची हद्दवाढ  काही दिवसातच होईल अशी अपेक्षा आमदार क्षीरसागर यांनी व्यक्त केली. (Kolhapur City expansion)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00