कोल्हापूर : कोल्हापूर मुस्कान लॉन येथे आयुब जमादार फौंडेशनच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत मुंबईच्या राजेश गोयलने अंतिम सामन्यात सिद्धार्थ वडवळकरचा २१/१७, २२/१८ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. गोयलला रोख रूपये २५,००० आणि सन्मान चषक तर उपविजेता वडवळकरला रोख रूपये १५,००० आणि चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत अडीचशे कॅरमपटूंनी सहभाग घेतला.(Kolhapur carrom)
या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचे उद्घाटन बालाजी गारमेंटचे उद्योजक प्रशांत पोकळे, आयुब जमादार फौंडेशनचे अध्यक्ष जुबेर जमादार, कैफ जमादार, मुस्कान लॉनचे मालक आजम जमादार, जिल्हा कॅरम असोसिएशनचे सचिव क्रीडामहर्षी विजय जाधव, सचिन देसाई, अख्तर शेख यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या स्पर्धेत एकूण २५० कॅरमपंटूचा सहभाग होता. (Kolhapur carrom)
उपांत्य फेरीचा सामना राजेश गोयल वि. रोहित चौगुले कोल्हापूर यांच्यात झाला. रोहित चौगुले (तृतीय) अभिजित तिरपणकर (चतुर्थ) यांना प्रत्येकी पाच हजार रुपये आणि चषक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेतील ५ ते ८ क्रमांकांसाठी प्रत्येकी २००० रूपये, तर ९ ते १६ क्रमांकांसाठी प्रत्येकी एक हजार रुपये आणि चषक देण्यात आले. (Kolhapur carrom)
या वर्षीचा श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेता आंतरराष्ट्रीय खेळाडू अभिजित त्रिपणकर मूळचा कोल्हापूरचा आहे. त्याचाही फौंडेशनतर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी सब ज्युनिअर राज्य विजेता ओमकार वडर याचा सत्कार शाल व रोख एक हजार रुपये देऊन आयुब जमादार यांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला.
मुंबईचा कॅरमपंटू ओमकार टिळक याने स्वतःला मिळालेले रोख बक्षीस एक हजार त्यांनी ओमकार वडर याला देऊन उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. आयुब जमादार यांनी यावेळी यापुढे राज्य मानांकन स्पर्धा घेण्यात येईल, असे जाहीर केले. विशेष म्हणजे या सोळा कॅरमपटूंमध्ये कोल्हापूरचे रोहित चौगुले, अख्तर शेख, रियाज शेख यांनी स्थान मिळवले. (Kolhapur carrom)
सर्व विजेते कॅरमपंटूना आयुब जमादार फौंडेशनचे अध्यक्ष आयुब जमादार, प्रशांत पोकळे, कैफ जमादार, जुबेर जमादार, आजम जमादार, हाजी अस्लम, रवीराज कारिकर विजय जाधव, पत्रकार धीरज रुकडे यांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेचे नियोजन राज्यस्तरीय कॅरमपटू अख्तर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. (Kolhapur carrom)
आभार कैफ जमादार यांनी मानले. समालोचन धीरज रुकडे यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सचिन देसाई, आयुब मुल्ला, निशिकांत कवाळे, प्रवीण डोंगळे, चंद्रकांत सूर्यवंशी, दीपक पोवार, मोहन दाबडे, सूर्यकांत पाटील, मोहसीन शेख, फिरोज जमादार,अक्षय जाधव,गोपी शेख, साद उचगावकर यांनी बहुमोल सहकार्य केले.
हेही वाचा :
भारत-पाक सामन्यांचा आजवरचा इतिहास