कोल्हापूर : प्रतिनिधी : खंडोबा तालीम मंडळाने वेताळमाळ तालीम मंडळावर १-० असा निसटता विजय मिळवत चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. यंदाच्या हंगामात अंतिम फेरीत प्रवेश करण्याची खंडोबा संघाची दुसरी वेळ आहे. बालगोपाल तालीम मंडळ आयोजित ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर खेळवली जात आहे. (Khandoba win)
खंडोबा आणि वेताळमाळ या दोन संघातील पहिली उपांत्य लढत पाहण्यासाठी दोन्ही संघांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. पूर्वार्धात खंडोबाने सुत्रबद्ध चढाया केल्या. अदित्य लायकर, रोहन आडनाईकने चांगल्या चढाया केल्या. वेताळमाळच्या सर्वेश लायकरची चढाईही दाद मिळवणारी ठरली. ३६ व्या मिनिटाला अमिन खजीरने वेताळमाळचा गोलरक्षक पुढे आल्याचा फायदा घेत चेंडू गोलजाळ्यात धाडला. मध्यंत्तरास खंडोबा संघाने १-० अशी आघाडीवर होता. (Khandoba win)
उत्तरार्धात परतफेड करण्यासाठी वेताळमाळने जोरदार प्रयत्न केले. वेताळमाळच्या मणीकंडमचा हेड गोलखांबाच्या वरुन गेला. पार्थ मोहिते, सर्वेश वाडकर, आकाश माळी, प्रणव कणसे यांच्या चढाया दाद मिळवणाऱ्या ठरल्या. पार्थ मोहितेचा फटका वेताळमाळचा गोलरक्षक देबोषिष घोषालने पंच करुन बचाव केला. खंडोबाकडूनही कुणाल दळवी, रोहन आडनाईक, पृथ्वीराज साळोखे, संकेत मेढे, प्रभू पोवार यांनी उत्कृष्ट चढाया केला. पूर्ण वेळेत एक गोलची आघाडी टिकवत खंडोबा संघाने सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. गोल नोंदवणाऱ्या अमिन खजीरची सामनावीर म्हणून निवड झाली. (Khandoba win)
शुक्रवारचा सामना : बालगोपाल तालीम मंडळ वि. संयुक्त जुना बुधवार, दुपारी ४.०० वा.
हेही वाचा :
धोनीकडे पुन्हा चेन्नईचे नेतृत्व