कोल्हापूर : प्रतिनिधी : अखेरच्या मिनिटाला गोल करत खंडोबाला तालीम मंडळाने पाटाकडील तालीम मंडळ ब संघाला २-१ अशा फरकाने पराभूत करत सतेज चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पाटाकडील तालीम मंडळ आयोजित ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर खेळवली जात आहे. (Khandoba team)
खंडोबा तालीम मंडळाला पाटाकडीलने तालीम मंडळ ब संघाने पूर्वार्धात कडवी झुंज दिली. मध्यंत्तरास सामना शून्य गोल बरोबरीत राहणार असे वाटत असताना जादा वेळेत सागर पोवारने गोल नोंदवत खंडोबा संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. (Khandoba team)
मध्यंत्तरानंतर परतफेड करण्याच्या इर्षेने पाटाकडील ब संघ मैदानात उतरला. त्यांना ४२ व्या मिनिटात बरोबरी साधण्यात यश मिळाले. साहिल भोसलेने गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. सामन्यात आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघांनी जोरदार प्रयत्न केले. खंडोबा संघाकडून रोहित जाधव, प्रभू पोवार, कुणाल दळवी, पृथ्वीराज साळोखे तर पाटाकडील ब संघाकडून साहिल भोसले, सार्थक राऊत, श्रेयस मुळीक, अजिंक्य मारलेकर, महमंद अत्तार यांनी चांगल्या चढाया केल्या. खंडोबा संघाच्या संकेत मेढेला पाटाकडीलच्या गोलरक्षकाने डी मध्ये अवैधरित्या रोखल्याने पंचांनी पेनल्टी किक बहाल केली. पण या संधीचा फायदा खंडोबा संघास घेता आला नाही. ऋतुराज संकपाळची पेनल्टी बाहेर गेली. सामना बरोबरीत राहणार असे वाटत असताना सामन्याच्या शेवटच्या ८० व्या मिनिटाला अशिष चव्हाणने गोल करत खंडोबा संघाला आघाडी मिळवून दिली. जादा वेळेतही ही आघाडी टिकवत खंडोबाने सामना जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. खंडोबा संघाच्या पृथ्वीराज साळोखेची सामनावीर म्हणून निवड झाली. (Khandoba team)
शनिवारचा सामना : शिवाजी तरुण मंडळ वि. वेताळमाळ तालीम मंडळ, दुपारी ४.०० वा.
हेही वाचा :
बसमध्ये महिलांचे पहिले पाऊल ठरवले ‘बॅड लक’!