Home » Blog » kejari hits back: दहा लाखांचा सूट घालणाऱ्याने ‘शीशमहल’बद्दल बोलू नये

kejari hits back: दहा लाखांचा सूट घालणाऱ्याने ‘शीशमहल’बद्दल बोलू नये

केजरीवाल यांचे पंतप्रधानांना सडेतोड उत्तर

by प्रतिनिधी
0 comments
kejari hits back

नवी दिल्ली : ‘जी व्यक्ती स्वतःसाठी २,७०० कोटी खर्च करून घर बांधते आणि जी दहा लाखांचा सूट सूट घालते, त्यांच्या तोंडी ‘शीश महल’ची भाषा शोभत नाही,’ असे प्रत्युत्तर ‘आप’चे समन्वयक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केजरीवाल यांच्यावर टीका करताना मी गरीबांसाठी घरे बांधली, स्वत:साठी शीशमहल नव्हे, असे म्हटले होते.  त्याला उत्तर देताना केजरीवाल यांनी प्रतिक्रीया देताना मी व्यक्तिगत आरोप करत नाही किंवा शिविगाळही करत नाही, असे स्पष्ट केले. (kejari hits back)

दिल्ली विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आप आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे.

शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली सरकारवर कठोर शब्दांत टीका करताना आप सरकारचा उल्लेख राष्ट्रीय राजधानीसाठी ‘आपत्ती’ असा केला होता. या टीकेला तिखट प्रत्युत्तर देताना केजरीवाल यांनी आप सरकारवरील सर्व आरोप फेटाळून लावले. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे. ‘आप’ सरकारने दिल्लीतील लोकांसाठी अथक परिश्रम घेतल्याचे ते म्हणाले.(kejari hits back)

पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ४३ मिनिटांच्या भाषणांपैकी ३९ मिनिटे दिल्लीतील लोकांनी निवडलेल्या सरकारला लाखाली वाहण्यातच घालवी २०१५ मध्ये दिल्लीच्या जनतेने केंद्रात भाजप आणि दिल्लीत ‘आप’ सरकारांची निवड केली. या दहा वर्षात ‘आप’ सरकारने केलेल्या कामाची यादी सांगायल गेलो तर दोन-तीन तास पुरणार नाहीत, असा दावाही केला. उलट वंचितांसाठी घरे देण्याबाबत केंद्र सरकार आश्वासने पूर्ण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.(kejari hits back)

भाजपच्या ‘संकल्प पत्र’मध्ये २०२२ पर्यंत दिल्लीतील प्रत्येकाला पक्के घर मिळेल, असे म्हटले होते. परंतु तेव्हापासून केंद्राने केवळ १,७०० लोकांना घरे दिली. भाजप गरीब विरोधी आहे. ते म्हणाले, ‘भाजपने दिल्लीतील झोपडपट्ट्या पाडून दोन लाखांहून अधिक लोकांना बेघर केले आहे. दिल्लीतील लोकांना दोष देण्याची गरज नाही. जो काम करतो तो दोष देत नाही.

दिल्लीसाठी आपत्ती : मोदी

पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीतील अनेक विकासप्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी केजरीवाल यांच्यावर जोरदार टीकास्र सोडले होते. गुरुवारी पंतप्रधान मोदी यांनी ‘आप’ सरकारचा उल्लेख दिल्लीसाठी ‘आपत्ती’ म्हणून केला होता. तसेच दिल्लीच्या नागरिकांसाठी एकीकडे केंद्र सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. दुसरीकडे आप सरकार केंद्राला खोटे ठरवत आहे. तसेच ‘आप’च्या पराभवाची हाक देत पंतप्रधानांनी नव्या युगाची सुरुवात करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते.

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00