कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नागपूरच्या प्रशांत कोरकरला न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आदेश दिला. त्यानंतर कोरटकरची रवानगी कळंबा कारागृहात करण्यात आली आहे. मंगळवारी एक एप्रिल रोजी त्यांच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. (Kalamaba jail)
कोरटकरची दोन दिवसाची पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर आज रविवारी सुट्टीच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पोलिसांनी त्याच्या पोलिस कोठडीची मागणी केली. पण न्यायालयाने कोरटकरला न्यायालयीन कोठडी दिली. त्यानंतर कोरकरच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला. पण आज सुट्टीचे कोर्ट असल्याने जामिनाची सुनावणी मुख्य प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस. तट यांच्यासमोर होईल असे न्यायालयाने सांगितले. मंगळवारी एक एप्रिल रोजी जामिनावर सुनावणी होणार आहे. (Kalamaba jail)
दरम्यान आज सुरक्षिततेच्या कारणावरुन कोरटकरला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने कोरटकरला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिल्यानंतर पोलिसांनी त्याची ताबडतोब कळंबा कारागृहात रवानगी केली. (Kalamaba jail)
कोरटकरला तेलंगणातून अटक केल्यानंतर न्यायालयाने पहिल्यांदा तीन दिवसाची आणि नंतर दोन दिवसाची पोलिस कोठडी दिली होती. पोलिस कोठडीत पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याला मदत करणाऱ्या पाच मित्रांची नावे उघड झाली आहेत. प्रशिक पडवेकर (रा.नागपूर), धीरज चौधरी (रा. चंद्रपूर), हिमायत अली (रा. इंदोर, मध्यप्रदेश), राजेंद्र जोशी (रा. इंदोर), साईराज पेटकर (रा. करीमनगर) अशी त्यांची नावे आहेत. पोलिस या सर्वांची चौकशी करत आहेत. मदत करणाऱ्या पाच जणांना पोलिस सह आरोपी करण्याची शक्यता आहे. (Kalamaba jail)
प्रशिक पडवेकर हा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या कार्यालयात काम करत होता असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. धीरज चौधरी हा बुक्कीमालक आहे. पोलिसांनी कोरटकरच्या दोन कार जप्त केल्या आहेत. १७ मार्च ते २४ मार्च या कालावधीत कोरटकरला दीड लाखांची रोख रक्कमेची मदत केली. ही मदत कोणी केली याचा तपास पोलिस करत आहेत. पसार काळात कोरकटरने नागपूर, चंद्रपूर, बैतुल, हैद्राबाद, इंदूर, करीमनगर येथे वास्तव्य केले होते. एकूण १८ ठिकाणी वास्तव्य केलेल्या ठिकाणाची पडताळणी पोलिसांकडून केली जात आहे. (Kalamaba jail)
हेही वाचा :
शेतकऱ्याचे दु:ख जाणणारा पोलिस अधिकारी हरपला
अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले