महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : रविचंद्रन अश्विनला मागे सोडत जसप्रीत बुमराह जागतिक कसोटीतील अव्वल वेगवान गोलंदाज ठरला आहे. बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शानदार कामगिरीच्या जोरावर आयसीसीच्या ताज्या कसोटी क्रमवारीत बुमराहने अव्वल स्थान पटकावले आहे. त्याचबरोबर युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली यांनीही कसोटी क्रमवारीत झेप घेतली आहे. (Jasprit Bumrah)
कसोटी मालिकेत बुमराहचा ‘अचुक’ मारा
भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत बुमराहने शानदार खेळी करत 11 बळी घेतले. या कामगिरीचा फायदा बुमराहला क्रमवारीत झाला आहे. सध्या जागतिक कसोटी क्रमवारीत बुमराह ८७० गुणांसह अव्वलस्थानी आहे. तर. ८६९ गुणांसह अश्विन दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.
दुसऱ्यांदा बुमराह क्रमवारीत अव्वलस्थानी
आपल्या कारकिर्दीत बुमराह दुसऱ्यांदा कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. याआधी फेब्रुवारीमध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर बुमराहने पहिले स्थान पटकावले होते. त्यांच्या आधी भारताचे दिग्गज खेळाडू कपिल देव कसोटी गोलंदाजांमध्ये अव्वल स्थान पटकवणारे एकमेव भारतीय गोलंदाज होते.
बांगला देशविरूद्ध झालेल्या कानपूर कसोटीत बुमराहने एकूण सात बळी घेतले, तर अश्विनने पाच बळी घेतले. त्याचबरोबर बांगलादेशच्या मेहदी हसन मिराज चार स्थानांची प्रगती करत १८व्या स्थानावर पोहोचला आहे. तर, अनुभवी फिरकी गोलंदाज शकिब अल हसन २८व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याला पाच स्थानांचा फायदा झाला आहे. (Jasprit Bumrah)
जयस्वाल तिसऱ्या क्रमांकावर
बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने दोन स्थानांनी प्रगती करत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. चार डावात त्याने ४७.२५ च्या सरासरीने १८९ धावा केल्या. यामध्ये त्याने तीन अर्धशतके झळकावली. फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत ज्यो रूट अव्वल तर केन विल्यमसन दुसऱ्या स्थानावर कायम आहे.
कानपूर कसोटीत कोहलीची मोलाची भूमिका
चेन्नई कसोटीत ६ आणि १७ धावांची इनिंग खेळून पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर कोहली आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या १० मधून बाहेर पडला होता. तथापि, कानपूर कसोटीत पुनरागमन करताना, त्याने ४७ आणि २९* धावांची खेळी खेळून भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. यासह तो ताज्या आयसीसी कसोटी क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे. आता त्याला ७२४ गुण मिळाले आहेत.
Say hello to ICC Men’s Number 1⃣ Test Bowler! 👋
Congratulations, Jasprit Bumrah! 👏👏@JaspritBumrah93 | #TeamIndia pic.twitter.com/DgTZi4eV26
— BCCI (@BCCI) October 2, 2024
हेही वाचा :
- चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का, एमएस धोनी पुढच्या आयपीएल हंगामाला मुकणार?
- भारतात होणार पहिला खो खो विश्वचषक
- प्रशांत किशोर राजकारणात; ‘जनसुराज पक्षा’ची घोषणा