Home » Blog » इस्रायलचे दक्षिण लेबनॉनमध्ये हल्ले

इस्रायलचे दक्षिण लेबनॉनमध्ये हल्ले

हेजबोला इस्रायलच्या दिशेने रॉकेट आणि क्षेपणास्त्रांचा मारा करण्याची मोठी योजना आखत असल्याचे इस्रायली लष्कराचे म्हणणे आहे.

by प्रतिनिधी
0 comments

जेरुसलेमः इस्रायलने रविवारी पहाटे दक्षिण लेबनॉनमध्ये जोरदार हवाई हल्ले केले. हेजबोला इस्रायलच्या दिशेने रॉकेट आणि क्षेपणास्त्रांचा मारा करण्याची मोठी योजना आखत असल्याचे इस्रायली लष्कराचे म्हणणे आहे, त्याचमुळे हेजबोलाला चोख प्रत्त्युत्तर देण्यासाठी हे हल्ले केल्याचा दावा करण्यात येत आहे.

गेल्या महिन्यात बैरूतमध्ये इस्रायली हवाई हल्ल्यात संस्थापकांपैकी एक असलेल्या फुआद शुकूर यांचा मृत्यू झाला. त्या हत्येला प्रत्युत्तर म्हणून इस्रायली लष्करी स्थानांवर हल्ला केल्याचे स्पष्टीकरण हेजबोलाने दिले. शनिवारी मध्यरात्री गोळीबार बंद करून दोन्ही बाजूंनी त्यांचे हल्ले लष्करी लक्ष्यांपर्यंत मर्यादित केले गेले. दरम्यान, वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे अमेरिका, इराण आणि अतिरेकी गटांमध्ये युद्ध सुरू होण्याची भीती आहे. गेल्या दहा महिन्यांहून अधिक काळ हेजबोलाचा सहयोगी पॅलेस्टिनी गट हमास आणि इस्रायलदरम्यान युद्ध सुरू आहे. या हल्ल्यांमुळे गाझामधील युद्धविरामाचे प्रयत्न विफल ठरण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00