Home » Blog » India Win : भारताची विजयी सलामी

India Win : भारताची विजयी सलामी

पहिल्या वन-डेमध्ये इंग्लंडवर ४ विकेटनी मात

by प्रतिनिधी
0 comments
India Win

नागपूर : शुभमन गिल, श्रेयस अय्यर व अक्षर पटेलच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वन-डेमध्ये ४ विकेटनी विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. (India Win)

इंग्लंडने विजयासाठी ठेवलेल्या २४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा व यशस्वी जैस्वाल हे सलामीवीर झटपट बाद झाले. त्यानंतर, श्रेयस व गिल यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी रचली. श्रेयसने ३६ चेंडूंमध्ये ९ चौकार व २ षटकारांसह ५९ धावांची खेळी केली. श्रेयस बाद झाल्यावर गिलने अक्षर पटेलसह शतकी भागीदारी रचली. अक्षरने ४७ चेंडूंमध्ये ६ चौकार व एका षटकाराच्या साहाय्याने ५२ धावा फटकावल्या. गिलने ९६ चेंडूंमध्ये १४ चौकारांसह ८७ धावा केल्या. एकोणचाळिसाव्या षटकात हार्दिक पंड्या व रवींद्र जडेजा जोडीने भारताचा विजय साकारला. इंग्लंडकडून साकिब महमूद आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. (India Win)

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा डाव ४७.४ षटकांत २४८ धावांत आटोपला. इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलर आणि जेकब बेथेल यांनी अर्धशतके झळकावली. भारतातर्फे वन-डे पदार्पण करणारा हर्षित राणा आणि अनुभवी रवींद्र जडेजाने प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. (India Win)

धावफलक : इंग्लंड फिल सॉल्ट धावबाद ४३, बेन डकेट झे. जैस्वाल गो. हर्षित ३२, जो रूट पायचीत गो. जडेजा १९, हॅरी ब्रुक झे. राहुल गो. हर्षित ०, जोस बटलर झे. पंड्या गो. अक्षर ५२, जेकब बेथेल पायचीत गो. जडेजा ५१, लियाम लिव्हिंगस्टोन झे. राहुल गो. हर्षित ५, ब्रायडन कार्स पायचीत गो. जडेजा १०, आदिल रशीद त्रि. गो. जडेजा ८, जोफ्रा आर्चर नाबाद २१, साकिब महमूद यष्टि. राहुल गो. कुलदीप २, अवांतर ५, एकूण – ४७.४ षटकांत सर्वबाद २४८.

बाद क्रम १-७५, २-७७, ३-७७, ४-१११, ५-१७०, ६-१८३, ७-२०६, ८-२२०, ९-२४१, १०-२४८.

गोलंदाजी महंमद शमी ८-१-३८-१, हर्षित राणा ७-१-५३-३, अक्षर पटेल ७-०-३८-१, हार्दिक पंड्या ७-१-३७-०, कुलदीप यादव ९.४-०-५३-१, रवींद्र जडेजा ९-१-२६-३.

भारत यशस्वी जैस्वाल झे. सॉल्ट गो. आर्चर १५, रोहित शर्मा झे. लिव्हिंगस्टोन गो. महमूद २, शुभमन गिल झे. बटलर गो. महमूद ८७, श्रेयस अय्यर पायचीत गो. बेथेल ५९, अक्षर पटेल त्रि. गो. रशीद ५२, केएल राहुल झे. व गो. रशीद २, हार्दिक पंड्या नाबाद ९, रवींद्र जडेजा नाबाद १२, अवांतर १३, एकूण ३८.४ षटकांत ६ बाद २५१.

बाद क्रम १-१९, २-१९, ३-११३, ४-२२१, ५-२२५, ६-२३५.

गोलंदाजी जोफ्रा आर्चर ७-१-३९-१, साकिब महमूद ६.४-०-४७-२, ब्रायडन कार्स ५-०-५२-०, आदिल रशीद १०-१-४९-२, जेकब बेथेल ३-०-१८-१, लियाम लिव्हिंगस्टोन ५-०-२८-०, जो रूट २-०-१०-०.

हेही वाचा :

स्टॉइनिसची वन-डेतून तडकाफडकी निवृत्ती
कमिन्स, हेझलवूड चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकणार
श्रीलंकेच्या पहिल्या दिवशी ९ बाद २२९ धावा

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00