Home » Blog » India-Pak : भारत-पाक सामने त्रयस्थ ठिकाणी

India-Pak : भारत-पाक सामने त्रयस्थ ठिकाणी

२०२७ पर्यंतच्या वेळापत्रकासंबंधी आयसीसीचा निकाल

by प्रतिनिधी
0 comments
India-Pak

दुबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान २०२७ पर्यंत खेळवण्यात येणारे आंतरराष्ट्रीय सामने त्रयस्थ ठिकाणी होतील, असा निर्वाळा आयसीसीने  आज (१९) दिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या या निर्णयामुळे पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे वेळापत्रक तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (India-Pak)

पाकिस्तानकडे २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद आहे. तथापि, भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिल्यामुळे भारताचे सामने त्रयस्थ ठिकाणी खेळवण्याचा प्रस्ताव समोर आला होता. पाकने सुरुवातीला हा प्रस्ताव नाकारला होता. मात्र, त्यानंतर नमते घेत एकीकडे हा प्रस्ताव स्वीकारण्याची तयारी दाखवून पाकचा संघही भारतात सामने खेळणार नाही, अशी भूमिका घेतली होती. अखेर आयसीसीने बोर्ड सदस्यांमध्ये मतदान घेत यावर तोडगा काढला. त्यानुसार, २०२४-२७ या काळामध्ये दोन्ही देशांमधील सामने त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात येतील व त्यामध्ये बाद फेरीतील सामन्यांचाही समावेश असेल, असे ठरले. त्यामुळे, २०२५चा महिला वन-डे वर्ल्ड कप आणि २०२६चा टी-२० वर्ल्ड कप या स्पर्धांनाही हाच नियम लागू होणार आहे. भारत २०२५ च्या महिला वर्ल्ड कपचा यजमान असून २०२६ चा वर्ल्ड कप भारत व श्रीलंकेमध्ये रंगणार आहे. (India-Pak)

भारत-पाक सामन्यांसाठी त्रयस्थ ठिकाण ठरवण्याचा अधिकार यजमान देशाला असेल, असेही आयसीसीने म्हटले आहे. त्यानुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामन्यांकरिता त्रयस्थ ठिकाणांचा प्रस्ताव पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) २४ तासांमध्ये आयसीसीसमोर सादर करावा लागणार आहे. संयुक्त अरब आमिरात हे या सामन्यांसाठीचे पहिल्या पसंतीचे ठिकाण असून श्रीलंकेचाही विचार केला जाऊ शकतो. (India-Pak)

हेही वाचा :

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00