नवी दिल्ली : पी. व्ही. सिंधू, किरण जॉर्ज या भारताच्या बॅडमिंटनपटूंनी इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अनुक्रमे महिला व पुरुष एकेरीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी या जोडीने उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. (India Open)
महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीमध्ये सिंधूने जपानच्या मानामी सुइझूला २१-१५, २१-१३ असे ४६ मिनिटांमध्ये पराभूत केले. उपांत्यपूर्व फेरीमध्ये सिंधूचा सामना इंडोनेशियाच्या चौथ्या मानांकित जॉर्जिया मरिस्का तुनजंगशी होईल. या गटात भारताच्या अनुपमा उपाध्यायला मात्र जपानच्या सहाव्या मानांकित तोमोका मियाझाकीकडून अवघ्या २८ मिनिटांत २१-६, २१-९ असा पराभव पत्करावा लागला. पुरुष एकेरीमध्ये किरण जॉर्जने फ्रान्सच्या ॲलेक्स लॅनिएरला २२-२०, २१-१३ असे हरवले. उपांत्यपूर्व फेरीमध्ये त्याचा सामना चीनच्या हाँग यँग वेंगशी होईल. (India Open)
पुरुष दुहेरीमध्ये सात्विक-चिराग जोडीला सातवे मानांकन आहे. दुसऱ्या फेरीमध्ये त्यांनी तीन गेमपर्यंत रंगलेल्या लढतीत जपानच्या केन्या मित्सुहाशी-हिरोकी ओकामुरा या जोडीचा २०-२२, २१-१४, २१-१६ असा पराभव केला. हा सामना १ तास १२ मिनिटे रंगला. महिला दुहेरीमध्ये भारताच्या तनिशा क्रॅस्टो-अश्विनी पोनप्पा या सातव्या मानांकित जोडीचे आव्हान दुसऱ्या फेरीमधअयेच संपुष्टात आले. जपानच्या युकी फुकुशिमा-मायू मात्सुमोतो या जोडीने तनिशा-अश्विनी जोडीवर २१-९, २३-२१ अशी मात केली. जपानच्या द्वितीय मानांकित हा ना बेक-सो ही ली या जोडीने भारताच्या ऋतापर्णा पांडा-श्वेतापर्णा पांडा या जोडीला २१-६, २१-७ असे नमवले. (India Open)
मिश्र दुहेरीमध्येही दुसऱ्या फेरीमध्ये भारताच्या दोन्ही जोड्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. जपानच्या आठव्या मानांकित हिरोकी मिदोरीकावा-नात्सू साइतो या जोडीने ध्रुव कपिला-तनिशा क्रॅस्टो यांचा २१-१८, २१-१७ असा पराभव केला. चायनीज तैपेईच्या पाचव्या मानांकित पोसुआन यँग-लिंग फँग हू या जोडीने भारताच्या अशिथ सूर्या-अमृता प्रमुथेश या जोडीवर २१-८, २१-११ असा विजय मिळवला. (India Open)
Local hero Pusarla V. Sindhu 🇮🇳 goes up against Manami Suizu 🇯🇵.#BWFWorldTour #IndiaOpen2025 pic.twitter.com/LSDzTWCkpz
— BWF (@bwfmedia) January 16, 2025
हेही वाचा :
सिनर, फ्रिट्झ तिसऱ्या फेरीत