महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर आहे. दौऱ्यातील पहिला कसोटी सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. वरूण राज्याच्या दमदार फलंदाजीमुळे कसोटीतील पहिला वाहून गेला. दुसऱ्या दिवशीच्या खेळात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि मायभूमीतील ३७ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. बंगळुरू कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा कर्णधार रोहित शर्माचा निर्णय सपशेल चुकीचा ठरला. प्रथम फलंदाजी करताना भारताचा पहिला डाव अवघ्या ४६ धावांवक आटोपला. घरच्या मैदानावर भारताची ही सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी १९८७ मध्ये मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या दिल्ली कसोटीत संघ ७५ धावांवर ऑलआऊट झाला होता. (IND vs NZ 1 Test)
अण् फलंदाजीचा निर्णय फसला…
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव ४६ धावांवर पत्याच्या बंगल्या सारखा कोसळला. खराब वातावरण आणि न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी केलेला अचुक मारा यामुळे भारताचे फलंदाज मैदानावर फार काळ टिकू शकले नाहीत. यात विराट कोहली, सरफराज खान, केएल राहुल, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या पाच फलंदाजांना सामन्यात भोपळाही फोडता आला नाही. फलंदाजीमध्ये रिषभ पंतने सर्वाधिक धावा केल्या. यापूर्वी १९९९ साली झालेल्या मोहाली कसोटीत न्यूझीलंडने भारताचे ५ फलंदाज शून्यांवरती बाद केले होते.
ऋषभ पंतच्या सर्वाधिक २० धावा
भारताच्या पहिल्या डावात ऋषभ पंतने सर्वाधिक २० धावा केल्या. तर यशस्वी जैस्वालने १३ धावांची खेळी केली. रोहित शर्मा दोन धावा करून बाद झाला तर जसप्रीत बुमराह एक धाव काढून बाद झाला. गोलंदाजीत न्यूझीलंडनच्या मॅट हेन्रीने ५, तर विल्यम ओ’रुर्कने ३ विकेट्स घेतल्या आहेत. (IND vs NZ 1 Test)
टीम इंडियाची नीच्चांकी धावसंख्या
- १९४७ मध्ये ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५८
- १९५२ मध्ये मँचेस्टर येथे इंग्लंडविरुद्ध ५८
- १९७४ मध्ये लंडनमध्ये इंग्लंडविरुद्ध ४२
- २०२० मध्ये ॲडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३६
- २०२४ मध्ये बेंगळुरू येथे न्यूझीलंडविरुद्ध ४६ (पहिला डाव)
घरच्या मैदानावर सर्वात कमी धावसंख्या १९८७ दिल्लीत वेस्ट इंडिजविरुद्ध ७५-ऑलआउट
Innings Break!#TeamIndia all out for 46.
Over to our bowlers now! 👍 👍
Match Updates ▶️ https://t.co/8qhNBrrtDF#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/GhqcZy2rby
— BCCI (@BCCI) October 17, 2024
हेही वाचा :
- खानापूर तालुक्याला परतीच्या पावसाने झोडपले
- नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी
- आगीत होरपळून तिघांचा मृत्यू