Home » Blog » Golden Lion Tamarin : ‘सोनेरी सिंहा’चा संघर्ष

Golden Lion Tamarin : ‘सोनेरी सिंहा’चा संघर्ष

संवर्धनासाठी वन्य-पर्यावरणप्रेमींची धडपड

by प्रतिनिधी
0 comments
Golden Lion Tamarin

वॉशिंग्टन : १५१९ मध्ये यशस्वी पृथ्वी प्रदक्षिणा करणाऱ्या पहिल्या समुद्रप्रवासातील एक प्रवासी असलेल्या अन्टोनियो पिगाफेटा यांना हा प्राणी आढळला. पूर्व ब्राझीलमध्ये आढळलेल्या या प्राण्याचे वर्णन त्यांनी ‘लहान सिंहासारखे सुंदर,’ ‘सीमियन मांजरी,’ असे केले. लहान माकडासारखा दिसणारा हा देखणा प्राणी म्हणजेच सोनेरी सिंह तामारिन (Golden Lion Tamarin).

त्याच्याबद्दची उत्सुकता पर्यावरणप्रेमींबरोबरच सामान्य नागरिकांतही वाढली. ब्राझिलियन टपाल तिकीट आणि चलनी नोटांवर त्याला स्थान मिळाले. त्याचे मूळ स्थान रिओ दी जनेरिओ राज्यातील अटलांटिक रेनफॉरेस्ट. त्याच्या अधिवासातील हस्तक्षेप वाढले. त्याची लोकप्रियता आजही कायम असली तरी ती प्रजाती धोक्यात आली.(Golden Lion Tamarin)

रिओ दी जनेरिओतील अटलांटिक रेनफॉरेस्टचे क्षेत्र टक्के कमी झाले. त्यापैकी ८० टक्के जंगल विखंडित आहेत. जंगलाचे बहुतेक तुकडे तामारिनचे निरोगी प्रजनन आणि वाढीसाठी खूपच लहान आहेत. त्यामुळे ते पकडले जाऊ लागले. मानवस्नेही असल्याने ते पकडून त्यांची विक्रीही मोठ्या प्रमाणावर होऊ लागली. त्याचा अस्तित्वाचा संघर्ष सुरू झाला. ती प्रजाती नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर आली. १९७०च्या दशकापर्यंत यांची जंगलातील संख्या केवळ दोनशेपर्यंतच उरली.(Golden Lion Tamarin)

वन्यजीवप्रेमींसाठी ही बाब धक्कादायक होती. वन्यजीवप्रेमींनी प्रयत्न केले. त्याला पर्यावरणस्नेही धोरणाची जोड मिळाली. या माध्यमातून एक कृती कार्यक्रम आखला गेला. सोनेरी सिंहांचे निरीक्षण, त्यांची काळजी घेण्यासह त्यांच्या आरोग्यासाठी लसीकरण योजना आखण्यात आल्या. विशेष म्हणजे खंडित अधिवास पुन्हा जोडण्यात आले. परिणामी त्यांची संख्या वाढायला मदत झाली. आता ही संख्या चांगलीच वाढली आहे. सामान्य जनतेतही त्यांच्या संवर्धनाविषयी जागृती आणि आस्था वाढली आहे.

सोनेरी, काळे, काळ्या चेहऱ्याचे (सोनेरी शरीर असलेले) आणि सोनेरी डोक्याचे अशी या सोनेरी सिंहांची ओळख आहे. तो सर्वभक्षी आहे. मुख्यतः फळे आणि कीटक हे त्याचे खाद्य. या प्रजाती वाचवण्यासाठी राखीव वनक्षेत्रे निर्माण करण्याबरोबरच स्वयंसेवी संस्थाही आता काम करीत आहेत.

या प्राण्यांबद्दल २०१९मध्ये संगणक मॉडेलिंगचा वापर करून पुन्हा अभ्यास करण्यात आला. त्यावेळी २५ हजार हेक्टरवर संरक्षित जंगलक्षेत्रात किमान २,००० सोनेरी सिंह असल्याचे स्पष्ट झाले. त्यांची सध्याची संख्या आणि अधिवासाचा आकार आणखी वाढायला हवा, असे संशोधकांचे म्हणणे आहे. शिवाय त्यांच्या अधिवासाचा बराचसा भाग अजूनही नीटपणे जोडलेला नाही. तो जोडण्यासाठी स्वयंसेवी संस्था स्थानिक नागरिक प्रयत्नशील आहेत.

(सौजन्य : सीएनएन)

हेही वाचा :

 हत्तीने सोंडेने गरगरा फिरवले आणि फेकले

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00