Home » Blog » Gaekwad’s allegation : दीपक काटेचा गॉडफादर बावनकुळेच : प्रविण गायकवाडांचा आरोप

Gaekwad’s allegation : दीपक काटेचा गॉडफादर बावनकुळेच : प्रविण गायकवाडांचा आरोप

by प्रतिनिधी
0 comments
Gaekwad’s allegation

पुणे : प्रतिनिधी : अक्कलकोट येथे हल्ला करणारा दीपक काटे याचा गॉडफादर महायुतीतील महसूल मंत्री चंद्रशेखर बावकुळे आहेत. तसेच या गुन्हाचा तपास करणारा अधिकारी ढाकणे हाही बानवकुळेचा नातेवाईक आहे, असा खळबळजनक आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केला.  अक्कलकोट येथील कार्यक्रमाचे आयोजन करणारे जनमजेय भोसले यांच्याबद्दल शंकाही गायकवाड यांनी उपस्थित केली आहे. पुरोगामी कार्यकर्त्यावर हल्ला झाल्यावर आता अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार? असा सवाल गायकवाड यांनी उपस्थित केला. (Gaekwad’s allegation)

“दीपक काटे हा गुन्हेगार आहे. काटेवर स्वत:च्या भावाची हत्या, खंडणी असे गंभीर गुन्हे आहेत. तरीही भाजपच्या युवा मोर्चाचं सरचिटणीस पद दिले आहे. काटे हा चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत सातत्याने दिसला आहे. दीपक काटे याच्याकडे दोन पिस्तूल आणि २८ काडतुसे पुणे येथील विमानतळावर सापडली. मग, त्याला अटक झाली. पण, न्यायालयासमोर दीपक काटे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आणली नाही. ती समोर आणली तर दीपक काटे हा जामीनावर सुटला नसता. काटे याला मकोका लावून तुरुंगात डांबलं पाहिजे होता. दीपक काटे हा हस्तक आहे,” असे गायकवाड यांनी म्हटलं.

“देवेंद्र फडणवीस सभागृहात खोटे बोलले आहे. ते सांगतात, ‘मी सहकार्य केले नाही?’ मी कुठले सहकार्य केले नाही. माझी केस नोंदवून घेतली जात नव्हती. हा सरकार पुरस्कृत हल्ला होता. बामसेफ, संभाजी ब्रिगेड अशा संघटना संपवण्याची योजना बनवण्यात आली आहे. माझ्यावर खूनी हल्ला झाला होता. पण, गुन्हेगाराला शिक्षा करतील, मकोका लावलीत, हे मला वाटत नाही. तपास अधिकारी ढाकणे हा बावनकुळेंचा नातेवाईक आहे. हे सगळं प्लॅन करून केले होते,” असा आरोपही गायकवाड यांनी केला.

प्रविण गायकवाड म्हणाले, “जनमजेय भोसले यांची इच्छा होती की माझा सत्कार झाला पाहिजे. हा पुरूषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते होणार होता. पण, खेडेकर हे कार्यक्रमास उपस्थित राहिले नाहीत. तेथे गेल्यावर पहिल्यांदा माझ्यावर हल्ला करण्यात आला. मी कारमध्ये बसलो, तर दीपक काटे याने माझ्यावर हल्ला केला. जनमजेय भोसले यांचा सत्कार कार्यक्रम झाला. तिथे कुठलाही निषेध नोंदवण्यात आला नाही. आयोजकांनी कुठलीही पोलीस तक्रार केली नाही. या परिस्थितीत तिथे चार ते पाच तास होतो.” (Gaekwad’s allegation)

आमची आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वैचारिक लढाई

“संभाजी ब्रिगेड, बामसेफ आणि वंचित बहुजन आघाडीचा बंदोबस्त करण्यासाठी मागील महिन्यात एक बैठक झाली होती. खरेतर दीपक काटेला आर्म अॅक्टनुसार जामीन मिळू शकत नाही. मग, काटेला जामीन कुणी दिला? काटे हा बावनकुळेंना ‘गॉडफादर’ म्हणतो. गॉडफादर म्हणतात, ‘तुम्ही काहीही करा, तुमच्यामागे देवेंद्र फडणवीस आहेत. मी स्वत: आहे.’ आमची आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वैचारिक लढाई आहे. मागच्या काही महिन्यांपासून दीपक काटे हा मागणी करतोय की, ‘संभाजी ब्रिगेड’ नावातून छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख होत आहे. पण, १० वर्षांपूर्वी मुंबईत ‘छत्रपती संभाजी ब्रिगेड’ ही संघटना सचिन कांबळे यांनी रजिस्टर केली आहे. त्यामुळे आमच्या आणि कांबळे यांच्या संघटनेत ‘छत्रपती’ शब्दाचा अंतर आहे. पण, तो ‘छत्रपती’ शब्द आम्हाला मिळवायचा असेल तर कांबळे यांनी संमती दिली पाहिजे,” असे मत गायकवाड यांनी व्यक्त केले. (Gaekwad’s allegation)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00