बेळगाव : प्रतिनिधी : बेळगाव पोलिसांनी अल्पवयीन मुलाला दुचाकी चालवायला दिल्याबद्दल पालकांना पंचवीस हजार रुपयांचा दंड ठोठावला. अल्पवयीन मुलगा दुचाकीवर मागे एकाला बसवून फिरत असल्याचा व्हिडीओ एका जागरूक नागरिकांने काढून सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या फोटोची दखल घेऊन पोलिसांनी त्या स्कुटीच्या नंबर वरून मालकाचा पत्ता शोधून स्कुटी जप्त केली. नंतर मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पोलीसांनी अल्पवयीन मुलाच्या पालकांकडून पंचवीस हजार रुपयांचा दंड वसुल केला. (Fine of ₹25,000 imposed on parents of a minor two-wheeler rider)
अल्पवयीन मुलांना गाडी चालवायला देणे हा गुन्हा आहे. त्यामुळे वाहन चालवणाऱ्या अल्पवयीन मुलगा आणि रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला देऊ नये. यापुढेही अल्पवयीन चालकांच्या विरोधात मोहीम सुरूच असणार आहे बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी सांगितले. Fine of ₹25,000 imposed on parents of a minor two-wheeler rider)