बेळगाव : प्रतिनिधी : गोव्यातील फोंड्याचे माजी आमदार लहू मामलेदार (६८) यांचा बेळगावात रिक्षाचालकाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी रिक्षाचालकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन माहिती घेतली. (Ex MLA beaten)
लहू नार्वेकर हे बेळगावातील श्रीनिवास लॉज येथे आपल्या कारमधून जात होते. त्यावेळी त्यांची कार एका रिक्षाला घासली. त्याकडे दुर्लक्ष करून ते कारमधून लॉजकडे गेले. रिक्षाचालक त्यांच्या कारचा पाठलाग करत लॉजकडे पोचला. नंतर त्याने लहू मामलेदार यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. मारहाण केली. (Ex MLA beaten)
यावेळी तेथे जमलेल्या लोकांनी आणि लॉजच्या कर्मचाऱ्यांनी लहू मामलेदार यांना सोडवून घेतले. नंतर त्यांना लॉजमध्ये जाण्यास सांगितले. लॉजमध्ये रिसेप्शन जवळ पोचल्यावर ते तेथेच खाली कोसळले. लगेच त्यांना जिल्हा रुग्णालयात त्वरित नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली आणि त्यांनी लहू मामलेदार यांना मृत घोषित केले. मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मार्केट पोलीस स्थानकात या प्रकरणाची नोंद झाली आहे.
हेही वाचा :