Home » Blog » ED raids in Delhi-NCR: ९८८ कोटींची बँक कर्ज फसवणूक; ईडीचे छापे

ED raids in Delhi-NCR: ९८८ कोटींची बँक कर्ज फसवणूक; ईडीचे छापे

by प्रतिनिधी
0 comments
ED raids in Delhi-NCR

नवी दिल्ली : ९८८ कोटींच्या बँक कर्ज फसवणूक प्रकरणात ईडीने दिल्ली-एनसीआरसह पंजाबमधील अनेक ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापे टाकले. शिल्पी केबल्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड (एससीटीएल) या कंपनीच्या प्रवर्तकांवर आणि काही संबंधित संस्थांवर ईडीने हे छापे टाकल्याचे सूत्रांनी सांगितले. (ED raids in Delhi-NCR)

९८८ कोटी रुपयांच्या कथित बँक कर्ज घोटाळ्याच्या प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग चौकशीचा भाग म्हणून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी (२५ जून) अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले.(ED raids in Delhi-NCR)

शिल्पी केबल्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड (एससीटीएल) या कंपनीच्या प्रवर्तकांवर आणि काही संलग्न संस्थांवर ही कारवाई करण्यात येत आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) दिल्ली-एनसीआरमधील नऊ आणि जालंधरमधील एका ठिकाणी हे छापे टाकण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले.

शिल्पी केबल्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड (एससीटीएल) या कंपनीच्या प्रवर्तकांवर आणि त्यांच्याशी संबंधित काही संस्थांवर ही कारवाई करण्यात येत आहे.

आयडीबीआय बँकेच्या नेतृत्वाखालील बँकांच्या संघाची एससीटीएलच्या प्रवर्तकांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ९८८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे. त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा हा खटला सुरू झाला आहे, असे त्यांनी सांगितले.(ED raids in Delhi-NCR)

एलएससी (लेटर्स ऑफ क्रेडिट) वापरून बँकांकडून मिळवलेल्या पैशाचा (कर्जाचा) मोठा भाग ‘बनावट’ व्यवहारांद्वारे परदेशात हस्तांतरित करण्यात आला असल्याचा ईडीला संशय आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) मनीष गोयल यांच्यावर तपास केंद्रीत करण्यात आला आहे.

हेही वाचा :
आणीबाणी हा सर्वांत काळा अध्याय : मोदी
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदारवाढ ही मतचोरीच : काँग्रेस

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00