Home » Blog » दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

दूधगंगा धरणातील गळती काढण्याचे कामाचा जानेवारी २०२५ मध्ये महुर्त

गळती काढण्याच्या कामासाठी ८०.७२ कोटीं निधीस मंजुरी

by प्रतिनिधी
0 comments
Dudhganga Dam

कोल्हापूर; प्रतिनिधी : दूधगंगा काळम्मावाडी धरणाला लागलेल्या गळती काढण्यास कामास जानेवारी २०२५ मध्ये सुरुवात होणार आहे. जून २०२५ पर्यंत सिंचनासाठी आवश्यक पाणीसाठ्याचे नियोजन करुन गळती काढण्याचे काम होणार असल्याचे पत्रक पाटबंधारे विभागाने काढले आहे. धरणाला लागलेल्या गळतीमुळे धरणाच्या काही परिणाम होणार असून नागरिकांनी भिती बाळगू नये, असे आवाहनही दूधगंगा कालवे विभाग क्रमांकाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिले आहे. (Dudhganga Dam)

दूधगंगा धरण हे २५.४० टीएमसी क्षमतेचे असून कोल्हापूर जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टर क्षेत्र या धरणाच्या पाण्याच्या सिंचनाखाली येते. तसेच आंतरराज्य करारानुसार कर्नाटक राज्यास नदी आणि कालव्याद्वारे चार टीएमसी पाणी सिंचनासाठी सोडले जाते. तसेच कोल्हापूर शहरासाठी थेट पाइपलाइनद्वारे धरणातून पाणी उपसा केले जाते.

धरणातून पाण्याचा साठा ज्यावेळीपासून सुरू झाला तेव्हापासून २००७ पासून धरणातून गळती होत आहे. सुरवातीला सेकंदाला ३६० लिटर इतकी गळती होती पण प्रतिबंधक उपाय केल्यानंतर २०१६ मध्ये ती प्रतिसेकंद १६६ लिटरवर आली.  (Dudhganga Dam)

 जलसंपदा विभागांतर्गत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व केंद्र शासनाच्या सीडब्लू आणि पीआरएस पुणे या संस्थेकडून या विषयी पहाणी करुन याबाबत अभ्यास करण्यात आला आहे.  सध्या धरणाची गळती प्रतिसेकंद ३५० असून ही  जास्त प्रमाणात असल्याने जलसंपदा विभाग पुणे मुख्य अभियंता यांच्या पाहणीनंतर धरणाच्या स्थैर्यता व सुरक्षिततेकरिता गळती प्रतिबंधक उपाय योजनेचे काम सर्व प्रशासकीय मान्यता  सोपस्कार पूर्ण करुन प्रत्यक्ष हाती घ्यावे, अशा सुचना दिल्या आहेत. दरम्यान ही गळती रोखण्याकरिता सर्व आवश्यक चाचण्या, अभ्यास विविध संस्था यांच्याकडून पूर्ण करण्यात आल्या असून त्याप्रमाणे सुचविण्यात आलेल्या सर्व उपाययोजना अंमलात आणण्याकरिता ग्राऊटिंग व इतर बांधकाम करावयाचे ८०.७२ कोटी रुपये इतक्या रक्कमेच्या प्रस्तावास  २७ ऑक्टोबर २०२३ अन्वये शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. आठ ऑक्टोबर २०२४ रोजी गळती प्रतिबंधक उपाय योजनेच्या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत.

२१ डिसेंबर  रोजी धरणातील गळती ही प्रतिसेकंद २७७ लिटर इतकी आहे. तसेच ठेकेदाराकडून मनुष्यबळ व आवश्यक ती यंत्रसामुग्री धरणस्थळी तैनात करण्यात आली आहे. शासनाच्या मार्गदर्शनानुसार या कामाकरिता महामंडळ कार्यालयाकडून १३ डिसेंबर २०२४ अन्वये तज्ञांची समिती गठीत करण्यात आली आहे. सध्या  धरणामध्ये ६६७.०१ दलघमी इतका पाणीसाठा असून सिंचनाचे नियोजनसुध्दा असल्यामुळे गळती प्रतिबंधक कामाचे नियोजन करण्याकरीता तज्ञ समितीची क्षेत्रीय पाहणी होणे आवश्यक आहे. २४ डिसेंबर रोजी या समितीची क्षेत्रीय पाहणी होणार आहे. समितीच्या सल्ल्यानुसार  सुचनेनुसार गळती प्रतिबंधक उपाय योजनेच्या कामास प्रत्यक्षात जानेवारी २०२५ मध्ये सुरुवात होणार आहे. (Dudhganga Dam)

हेही वाचा :

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00