Home » Blog » DPDC Kolhapur : कोल्हापूरसाठी ९४० कोंटींचा प्रस्ताव

DPDC Kolhapur : कोल्हापूरसाठी ९४० कोंटींचा प्रस्ताव

जिल्हा नियोजन बैठकीत मंजुरी

by प्रतिनिधी
0 comments
DPDC Kolhapur

कोल्हापूर : प्रतिनिधी : जिल्ह्याच्या विकासकामासाठी ९४०.०३ कोटींच्या प्रारूप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली. विभागास्तरावरील सात फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीत यातील जास्तीत जास्त निधी मिळविण्यासाठी मागणी करणार असल्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.(DPDC Kolhapur )
जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला अध्यक्षस्थानी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर होते.
यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास, औकाफ राज्यमंत्री तथा सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ, खासदार शाहु महाराज छत्रपती, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, आमदार जयंत आसगांवकर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार डॉ.अशोकराव माने, आमदार शिवाजी पाटील, आमदार राहूल आवाडे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपस्थित होते.(DPDC Kolhapur )
२०२५-२६ मध्ये जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण साठी ५१८ कोटी ५६ लाख रुपये अर्थसंकल्पीत तरतूद करण्यात आली आहे. तर अनुसूचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना) ११८ कोटी रुपये तर ओ.टी.एस.पी. योजनेत दोन कोटी ३२ लाख रुपयांची अर्थसंकल्पीत तरतूद करण्यात आली आहे. तीनही घटकांमध्ये अतिरिक्त ४२१.४७ कोटींची मागणी आहे. अशा प्रकारे २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून १०६०.१५ कोटी रूपयांचा प्रारूप आराखडा शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.(DPDC Kolhapur )
२०२४-२४ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेसाठी (सर्वसाधारण) ५६७ कोटींच्या अर्थसंकल्पीत तरतूद करण्यात आली होती. यापैकी २३० कोटी ४० लाख रूपये निधी प्राप्त झाला आहे. आज अखेर रक्कम रूपये ११४ कोटी ९६ लाखांचा निधी खर्च करण्यात आलेला आहे. प्राप्त तरतूदीपैकी ६३ टक्के निधी खर्च झाला आहे. अनुसुचित जाती योजनेसाठी (विशेष घटक योजना) ११८ कोटींच्या अर्थसंकल्पीत तरतूद करण्यात आली असून, यापैकी ३७ कोटी ६२ लाख निधी प्राप्त झाला आहे. २० जानेवारी २०२५ अखेर ३४ कोटी ८६ लाख निधी खर्च करण्यात आलेला आहे. प्राप्त तरतूदीपैकी ९३ टक्के निधी खर्च झाला आहे. आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील क्षेत्रात दोन कोटी ३२ लाख अर्थसंकल्पीत तरतूद करण्यात आली असून, यापैकी ९३ लाख निधी प्राप्त झाला आहे. 20 जानेवारी अखेर ३० लाख निधी खर्च करण्यात आलेला आहे. प्राप्त तरतूदीपैकी ३२ टक्के निधी खर्च झाला आहे. या सर्व झालेल्या खर्चास यावेळी मंजूरी देण्यात आली.(DPDC Kolhapur )

नियोजनात स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवा : पालकमंत्री आबिटकर
जिल्हास्तरावरून अनेक विकासकामांचे नियोजन होते, त्याला मंजुरी दिली जाते. निधीही वर्ग केला जातो. या प्रक्रियेत संबंधित तालुक्यातील आमदार व खासदार यांच्याशी समन्वय ठेवून योजनांना मंजुरी द्या. त्यांनी दिलेल्या सूचना प्राधान्याने त्या त्या योजनेत समाविष्ट करा अशा सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. आरोग्य व शिक्षण हे दोन घटक विकास प्रक्रियेला बळ देणारे आहेत. सुदृढ व शिक्ष‍ित समाज निर्माण करण्यासाठी या दोन घटकांना अधिकचा निधी येत्या काळात देणार असल्याचे त्यांनी सांगितले. श्री करवीर निवासिनी अंबाबाई विकास आराखडा, श्री जोतिबा विकास आराखडा, कन्व्हेंशन सेंटर आदी महत्त्वाच्या विषयांबाबत राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री स्तरावर बैठक लावून सर्व प्रकल्पांना गती देण्यासाठी पुढिल काळात प्रयत्न केले जाणार आहेत. .(DPDC Kolhapur )

कोल्हापूरच्या विकासासाठी सर्व मिळून प्रयत्न करू : सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ
कोल्हापूरमध्ये अनेक धार्मिकस्थळांचा विकास करताना दक्षिण काशीच्या धर्तीवर तो केला जाईल. सर्व नियोजित कामे मार्गी लावून स्थानिक गरजांच्या अनुषंगाने येत्या काळात विकासकामे केली जातील. कोल्हापूरचा विकास साधत असताना सर्व मिळून प्रयत्न करू असे सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले. यावेळी त्यांनी चंदगड येथील मागणीनुसार पाच एसटी बसेस देण्याचे जाहीर केले.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00