Home » Blog » devotees vandalise train : रेल्वेचे १२ एसी डबे फोडले

devotees vandalise train : रेल्वेचे १२ एसी डबे फोडले

दरवाजे बंद असल्याने महाकुंभला जाणाऱ्या संतप्त भाविकांचे कृत्य

by प्रतिनिधी
0 comments
devotees vandalise train

समस्तीपूर : बिहारच्या मधुबनी आणि समस्तीपूर रेल्वे स्टेशनवर स्वतंत्रता सेनानी सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यांच्या काचा फोडण्यात आल्या. जयनगरहून प्रयागराजसाठी निघालेल्या भाविकांनी या काचा फोडल्या आणि खिडक्यांची मोडतोड केली. प्रयागराजसाठी जाणाऱ्या भाविकांची प्रचंड गर्दी, त्यातच या मोडतोडीच्या प्रकारामुळे रेल्वेस्टेशनवर प्रचंड गोंधळ उडाला. या प्रकरणी रेल्वे सुरक्षा दल पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.  (devotees vandalise train)

प्रयागराजच्या दिशेने जाणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड आहे. त्या तुलनेत बसेस आणि रेल्वेगाड्या नाहीत. आधीच प्रयागराज आणि आसपासच्या गावांत प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. भाविकांचा लोंढा सतत वाढतोच आहे. मात्र गाड्या नसल्याने संतापात भर पडत आहे. जयनगरहून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या स्वतंत्रता सेनानी सुपरफास्ट एक्स्प्रेससाठी प्रचंड गर्दी होती. प्रवासी गाडीत जाण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र आतून दरवाजे लॉक करण्यात आले होते. त्यामुळे बाहेरचे प्रवासी संतापले. त्यांनी मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. काचा फोडल्या. त्यात जवळपास वातानुकूलित १२ डब्यांच्या खिडक्या फोडण्यात आल्या. नासधूस करण्यात आली. या घटनेत अनेकजण जखमी झाले आहेत.(devotees vandalise train)

घटनास्थळी असलेल्या एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, स्टेशनवर आलेल्या या गाडीत प्रवासी चढण्याचा प्रयत्न करीत होते, तथापि आतून दरवाजे बंद केले होते. विनंती करूनही दरवाजे उघडले गेले नाहीत. त्यामुळे प्रवासी संतापले. त्यांनी मोडतोड सुरू केली. रेल्वे अधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा दिला. मधुबनी रेल्वे स्टेशनवर महाकुंभसाठी जाणाऱ्या भाविकांची गर्दी होती. या दरम्यान काहींनी मोडतोड केली, असे त्यांनी सांगितले. समस्तीपूर स्थानकांवरही गर्दी होती. तेथे रेल्वे पोहोचल्यानंतर काच फुटलेल्या खिडक्यांतून प्रवाशांनी आत शिरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गोंधळात पुन्हा भर पडली. तेथे रेल्वे सुरक्षा दलाने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर गाडी रवाना करण्यात आली.

आम्ही गर्दी नियंत्रणात आणली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा कसलाही प्रश्न उद्भवला नाही. रेल्वे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांची चौकशी सुरू आहे, असे स्टेशन अधिकारी बी.पी. अलोक यांनी सांगितले. तसेच मधुबनी स्टेशनवर गाडीची मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

प्रयागराजमधील भाविकांची स्थिती गंभीर
‘महाकुंभ’मध्ये वाहतूक व्यवस्थापनाचा बोजवारा

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00