महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर आहे. दौऱ्यातील पहिला कसोटी सामना आजपासून (दि.१६) बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार होता. परंतु, वरूण राजाच्या दमदार फलंदाजीमुळे सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करावा लागला आहे. उद्या पावसाने उघडीप दिल्यास सकाळी ८.४५ ला नाणेफेक तर ९.१५ ला सामन्याला सुरूवात होणार आहे.
भारत आणि न्यूझीलंडचे खेळाडू सकाळी चिन्नास्वामी स्टेडियमवर पोहोचले. यावेळी दोन्ही संघातील काही खेळाडू मैदानात सराव करतानाही दिसले. मात्र मुसळधार पावसामुळे आजचा दिवसभराचा खेळ रद्द करावा लागला. पावसामुळे नाणेफेकही होवू शकली नाही. (IND vs NZ 1st Test)
आज दिवसभर पावसाची शक्यता होती. मध्येच काही वेळ पाऊस थांबला, पण मैदानावर खड्डे पडल्याने खेळपट्टी इतक्या सहजासहजी सुकवता आली नाही. यामुळे खेळपट्टी कव्हरखाली राहिली. आज बेंगळुरूमध्ये ऑरेंज अलर्ट होता. यामुळे शाळाही बंद ठेवण्यात आल्या होत्या. बंगळुरूमध्ये मंगळवारपासून पाऊस पडत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पष्ट केले आहे की, गुरुवारी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी 98 षटके टाकली जातील.
न्यूझीलंड मालिका भारतासाठी महत्वाची
न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी भारताला आणखी आठ कसोटी खेळायच्या आहेत. त्यापैकी पाच सामने जिंकावे लागणार आहेत.
🚨 Update from Bengaluru 🚨
Day 1 of the 1st #INDvNZ Test has been called off due to rain.
Toss to take place at 8:45 AM IST on Day 2
Start of Play: 9:15 AM IST #TeamIndia | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/RzmBvduPqr
— BCCI (@BCCI) October 16, 2024
हेही वाचा :
- Eknath Shinde : ‘कॉमन मॅन’ला ‘सुपरमॅन’ करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- गद्दारांना गाडण्याची वेळ झाली : खासदार डॉ. अमोल कोल्हे
- साखरेचा किमान विक्री दर वाढायला हवा : वैभवकाका नायकवडी